“जागृतीने साकारले प्रभू श्रीरामचंद्र” ‘ श्रीराम ‘ शब्दाचा ३,१६५ वेळा वापर करत भक्ती व्यक्त- चि. जुगल बडगुजर, पुणे

रामजन्मभूमी वर उभारण्यात येत असलेल्या भगवान श्रीरामाच्या मंदिरांतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वातावरण संपूर्ण देशामध्ये असताना त्यात ग्रामीण भागही अपवाद नाही . ग्रामीण भागात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असल्याने ‘ राममय ‘ वातावरण आहे . प्रत्येक रामभक्त श्री प्रभू रामचंद्रांविषयीची आपली भक्ती व्यक्त करीत आहे . शिंदखेडा शहरात देखील एका विद्यार्थिनीने तीन हजार १६५ वेळा ‘ श्रीराम ‘ शब्द वापरून प्रभू रामचंद्रांचे चित्र रेखाटले आहे . या विद्यार्थिनीने कुठलाही चित्रकलेचा क्लास न लावता प्रभू श्रीरामचंद्रांचे चित्र रेखाटले आहे . त्या विद्यार्थिनीचे नाव आहे जागृती राजेंद्र बडगुजर , सोमवारी ( ता . २२ ) अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे . या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये गावागावात राममय वातावरण निर्माण झाले आहे. जाग्रृती एके दिवशी महाविद्यालयातून घरी असताना श्रीरामावर असलेली आपली भक्ती व्यक्त करावी हा विचार तीच्या मनात आला . ‘ श्रीराम ‘ या शब्दाचा वापर करून चित्र रेखाटण्यास सुरवात केली आणि पाहता पाहता कागदावर श्रीरामाची प्रतिमा तयार होत होती . श्रीरामाची प्रतिमा तयार करत असताना शब्दांच्या संख्येची पण नोंद मी ठेवत होते असे ती म्हटली . अखेर तीन हजार एकशे पासष्ट वेळा ‘ श्रीराम ‘ शब्द वापरून श्रीराम प्रभूंची प्रतिमा कागदावर तयार झाली . त्या वेळेला आनंद गगनात मावत नव्हता . जागृती बडगुजर प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसले तरी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रभू श्रीरामचंद्राप्रति आपली भक्ती व्यक्त करताना दिसत आहे . शिंदखेडा येथील गुरुकृपा कॉलनीमधील रहिवासी श्री. राजेंद्र लोटन बडगुजर यांची कन्या जागृती हिने श्रीराम शब्द तीन हजार १६५ वेळा लिहून प्रभू श्रीरामचंद्रांचे चित्र रेखाटले आहे . जागृती शिरपूर येथील आरसी पटेल फार्मसी महाविद्यालयात बी.टेक . च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे . चित्रकलेचा कुठलाही क्लास न लावता जागृतीने प्रभू श्रीरामचंद्रांचे चित्र रेखाटून सर्वांना सुखद धक्का दिला . प्रभू श्रीरामचंद्रांचे हे चित्र रेखाटण्यासाठी जागृतीने निळा काळा आणि लाल या रंगांच्या पेनाचा वापर केला आहे . चित्र रेखाटण्यासाठी जागृतीने ए३ कागद वापरला आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचे चित्र चार दिवसांत चित्र पूर्ण झाले आहे . जागृतीने श्रीराम शब्दाचा वापर करून प्रभू श्रीराम यांचे चित्र रेखाटल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्याला मोठा भाऊ जुगल व बहीण नेहा यांचे ही वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते असे ती म्हणाली.
जाग्रृती ही कै. लोटन निंबाशेट बडगुजर, अमळथे यांची नात आहे, श्री वासुदेव लोटन बडगुजर, नाशिक यांची पुतणी व श्री राजेन्द्र लोटन बडगुजर यांची लहान कन्या आहे..
कु. जाग्रृती हिच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹..! प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहो..जय श्रीराम..🚩🚩

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*