श्री. बापुराव श्रावण बडगुजर व सौ.ज्योती बडगुजर यांना दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण – श्री. गोपाल दत्तात्रय पवार, जलगांव

दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त संचालनाला
राणीचे बांबरुड ह. मु. पाचोरा येथील आदर्श शेतकरी श्री. बापूराव श्रावण बडगुजर व त्यांच्या पत्नी सौ. ज्योती बापुराव बडगुजर यांना येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या शासकीय संचलन कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. कृषी आयुक्तालय संचालक फलोउत्पादन कार्यालय, कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य विभाग पुणे व जिल्हा कृषी अधीक्षक जळगाव यांच्यातर्फे श्री. बापुराव श्रावण बडगुजर यांना हे सपत्नीक निमंत्रण प्राप्त झाले आहे. केंद्रशासन राष्ट्रीय कृषी विकासाच्या प्रती थेंब अधिक पीक योजने अंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसवलेल्या प्रभावी कृषी विषयक कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रजासत्ताक दिन दिल्ली येथे होणाऱ्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात संचलन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते. श्री. बापुसाहेब बडगुजर हे पाचोरा शहरातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात ते आपल्या शेतात कांदा, मोसंबी, गहू, हरभरा, केळी, मका सर्व पीक हे प्रति थेंब अधिक पीक ठिबक सिचन द्वारे ते उतपन्न हे घेत असतात व त्या पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव यांना सर्व प्रकारच्या योजना व त्यांचा उत्पादन वाढविण्यासाठी सर्व प्रकारची मदत ते करत असतात. अशा १० शेतकऱ्यांना या कार्यक्रमासाठी सहपत्नीक आमंत्रित करण्यात आले असून त्यात पाचोरा येथील श्री. बाबुराव श्रावण बडगुजर व सौ. ज्योती बडगुजर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. २४ ते २६ जानेवारी दरम्यान त्यांना शासनातर्फे दिल्ली येथे आमंत्रण करण्यात आले आहे याबद्दल बडगुजर दांपत्याचे परिसरातून कौतुक होत आहे व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. बापूराव श्रावण बडगुजर – 9420657582, 9423771508

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*