पिंपळकोठा येथील कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मंदीर निर्माण भूमिपूजन उत्साहात संपन्न ! – श्री ज्ञानेश्वर महादू बडगुजर, पिंपळकोठा

पिंपळकोठा :- दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी पिंपळकोठा (ता.एरंडोल) येथे श्री चामुंडा माता मंदीर समितीच्या माध्यमातून, कुलस्वामिनी श्री चामुंडा मातेच्या मंदिराचे भूमिपूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील ग्रामदेवतांना आमंत्रण देण्यासाठी भजनी मंडळाकडून गावात प्रभात फेरी काढण्यात आली, यानंतर श्री.राजेंद्र रामदास बडगुजर व सौ. आशाबाई राजेंद्र बडगुजर यांच्या हस्ते कळस पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे महासचिव प्रा. हिरालाल रघुनाथ बडगुजर (धुळे) हे होते. भूमिपूजन जि.प. सदस्य श्री नानाभाऊ महाजन व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री एस.आर.पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून क्षत्रिय बडगुजर समाज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेंद्र भालचंद्र बडगुजर (कुसुंबा), पा. समाजदूतचे संपादक प्रा. ईश्वर हरचंद बडगुजर (मुकटी), धुळे बडगुजर बोर्डिंगचे सेक्रेटरी श्री.अशोक सिताराम बडगुजर, धुळे बडगुजर बोर्डिंगचे उपाध्यक्ष श्री. मनोहर बन्सीलाल बडगुजर, श्री. चामुंडा माता ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नरेंद्र रामदास बडगुजर(लोहारी), अ.भा.नवोदय युवा मंचचे उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष तसेच एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव श्री.हेमराज साळुंखे, फागणे ग्रामपंचायत मा.उपसरपंच श्री. राजेश वसंत बडगुजर, अ.भा.नवोदय युवा मंचचे संस्थापक अमितकुमार चंद्रकांत बडगुजर (फागणे), श्री. चामुंडामाता मंदीर पिंपरखेड अध्यक्ष भरत पुंडलिक बडगुजर, एरंडोल बडगुजर समाज मंडळ अध्यक्ष राजेंद्र भटू पवार, पिंप्री येथील ह.भ.प. देविदास गुलाब बडगुजर, राजेंद्र महाराज यांच्यासह आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री. चामुंडा माता मंदीर हे बडगुजर हे लवकरच सांस्कृतिक विकासाचे केंद्र बनावे व ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक – युवतींसह आबाल वृद्धांसाठी श्रद्धास्थान म्हणून लौकिक प्राप्त व्हावा, ही चामुंडा माता चरणी प्रार्थना करून मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मंदीर निर्माणसाठी देणगी देणाऱ्या देणगीदारांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मंदीर निर्माण भूमिपूजनचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आई चामुंडा माता बडगुजर बहुउद्देशीय संस्थेच्या व श्री चामुंडा माता मंदीर समितीच्या माध्यमातून पिंपळकोठा येथील ज्ञानेश्वर माधव बडगुजर, गोपीचंद हरचंद बडगुजर, ज्ञानेश्वर रामभाऊ बडगुजर, वासुदेव राजेंद्र बडगुजर, श्याम सुभाष बडगुजर, बाळू रामभाऊ बडगुजर, किशोर बाबुराव बडगुजर, सोमनाथ संजय बडगुजर यांसह सर्वं पिंपळकोठा बडगुजर समाज तसेच सदर कार्यक्रमास महाराणा प्रताप बहुउद्देशीय सामाजिक संस्था, शिवराज्य संघटना पिंपळकोठा बु।। यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. समस्त सर्व समाज समावेशक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री शाम राजपूत सर यांनी केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*