दोंडाईचा येथिल कु. डॉ. मयूरी शिंदे हिला शासकीय दंत महाविद्यालय, औरंगाबाद (संभाजीनगर) येथे M. D. S. ( Prosthodontics) ला प्रवेश मिळाला. डॉ मयूरी शिंदे हि समाज भूषण श्री. नानासाहेब गंगाराम सुकलाल शिंदे यांची नात व सौ. निलीमा व प्रा. श्री बाळकृष्ण शिंदे यांची सुकन्या आहे. तिचा NEET MDS मध्ये संपूर्ण भारतात 33 वा आलेला होता. NEET MDS ही M. D. S. प्रवेश साठी परीक्षा आहे. डॉ मयूरी शिंदे हिने बी डी एस विशेष श्रेणीत उत्तीर्ण केलेले आहे. तसेच इ. १० व १२ वीला सुध्दा तिला विशेष श्रेणीत गुण मिळाले आहेत. तिला शिक्षणाबरोबर उत्कृष्ट चित्रकलेची व संगीत ची आवड आहे. तिच्या या यशाबद्दल उद्योगपती सरकारसाहेब सरकारसाहेबजी रावल, माजी मंत्री आमदार जयकुमार जी रावल यांनी अभिनंदन केले. तसेच आजोबा श्री मधुकर श्रीराम दातेराव( आईचे वडील), मामा मनीष दातेराव (दुबई), काका श्री किरण शिंदे, माजी प्राचार्य सामाजिक कार्यकर्ते श्री. हिरालाल आबा शिंदे,श्री.राजेंद्र दादा नंदवाळकर धुळे श्री एकनाथ शेठ बडगुजर ,डॉ प्रशांत बडगुजर जळगाव, डॉ.चेतन नंदवाळकर धुळे व सर्व नातेवाईक आणि मित्र मंडळी ने अभिनंदन केले
Leave a Reply