आज ७ जून-जागतिक पोहेदिन
🍛🍛🍛🍛🍛🍛🍛
सकाळच्या नाश्ताच्या अस्सल पारंपरिक पदार्थ म्हणजे पोहे.आजही प्रत्येक मराठी कुटुंबामध्ये सकाळी चहासोबत पोहेच नाश्तासाठी दिले जातात.केवळ सकाळचा नाश्ताच कशाला अगदी लग्न ठरवतांनाही प्रथम चहा-पोह्यांचा कार्यक्रम केला जातो.त्यामुळे पोह्यांची महती अशी काही शब्दांत सांगता यायची नाही.सुरुवातीच्या काळात साध्या असणाऱ्या पोह्यांमध्ये अनेक बदल केल्याचं पाहायला मिळालं.त्यामुळे आज कांदापोहे,बटाटा पोहे,तर्री पोहे असे अनेक पोह्याचे प्रकार पाहायला मिळतात.
“अलीकडे वड्याच्या गाडीवर केवडा मागितलेवर वडेवाला विचारतो-पोहे टाकून की विना पोहे”? विशेष म्हणजे वर्ल्ड फेमस असलेल्या या पोह्यांचा आज हक्काचा दिवस.हक्काचा दिवस म्हणजे आज जागतिक पोहे दिवस (World Poha Day) आहे.खरंतर पोह्यांचाही खास जागतिक दिन असतो हे फार कमी जणांना माहित आहे.
पहिला जागतिक पोहे दिन ७ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला.या दिवसाचा प्रणेता कोण हे नेमकं स्पष्ट नसलं तरीदेखील मॅगीच्या जगात आजही पोह्यांवर प्रेम करणारे असंख्य जण असल्याचं पाहायला मिळतं.मॅगीच्या गुणवत्तेवरुन सुरु झालेल्या वादामध्येच ट्विटरवर गमतीने कुणी तरी पोहे दिनाची संकल्पना मांडली आणि तिच पुढे रुजू झाली असं म्हटलं जातं.
दरम्यान,भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पोहे हा अविभाज्य घटक आहे. पोह्यांचे अनेक प्रकार आहेत. पातळ पोहे,जाड पोहे,हातसडीचे पोहे,दगडी पोहे, पटणीचे पोहे असे एक ना अनेक प्रकार पोह्यांचे पाहायला मिळतात.
आज सकाळचा बेत पोहे!
🔱c🔱d🔱s🔱🔱🔱🔱🔱🔱🔱c🔱d🔱s🔱🔱
Leave a Reply