रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका!!!
Plant plants, take selfies, win prizes
शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका” या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो नेहमीच काढतो पण आता तुम्ही रोपटं (झाड) लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो – सेल्फी काढून पाठवायचा. तुमच्या फोटोची निवड झाली तर तुम्हाला बक्षीस मिळेल. अशी ही भन्नाट कल्पना आहे.
पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, दिवसेंदिवस ग्लोबल वाॅर्मिंगमुळे वाढत असलेलं तापमान, कमी होणारं पर्जन्यमान, रुसलेला वरुणराजा आणि आग ओकणारा सूर्य.. या सर्व समस्यांवर वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे. लोकांना झाडं लावण्यासाठी उद्युक्त करणे हाच या स्पर्धेचा उद्देश आहे.
‘एक रोपटं लावा’ त्या रोपट्यासोबत सेल्फी किंवा फोटो काढून खालील ईमेलवर पाठवावा..
shikshak.dhyey@gmail.com
किंवा व्हाट्स ऍप करा..
7499868046
वरील पैकी सेल्फी एकाच ठिकाणी पाठवावा.
ही स्पर्धा निःशुल्क असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेचे नियम व अटीं वाचण्यासाठी https://www.shikshakdhyey.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
या मोहिमेचा उद्देश झाडाबरोबरच पर्यावरण जनजागृती व संवर्धनाचा असून निसर्ग वाचवण्यासाठी एक निकोप स्पर्धा घडवून आणून प्रत्येक माणसाच्या मनात झाडं लावण्याचा विचार रुजवण्याचा असल्यामुळे या स्पर्धेत राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक यांनी उत्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन शिक्षक ध्येयचे मुख्य संपादक मधुकर घायदार, कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, …..~आपले नाव, पद तसेच इतर नावे टाकू शकता~…. तसेच राज्यस्तरीय संपादकीय मंडळाने केले आहे.
ही स्पर्धा निशुल्क असून सर्वांसाठी खुली आहे. याचे नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत.
1) झाड देशी असावे.
2) रोपटं लावतांनाचा फोटो काढतांना उभा मोबाईल ठेवावा (धरावा).
3) संपूर्ण रोपटं आणि आपला चेहरा दिसेल असा सेल्फी किंवा फोटो काढावा.
4) सेल्फी सोबत आपली माहिती पाठवावी : संपूर्ण नाव, वय, विद्यार्थी असल्यास इयत्ता, संपूर्ण पत्ता, मोबा नंबर, व्हाट्स ऍप नंबर, कोणते झाड लावले त्याचे नाव, इ माहिती आवश्यक आहे. ही माहिती न पाठविल्यास सेल्फीचा विचार केला जाणार नाही.
5) निवडक स्पर्धकांना शिक्षक ध्येयचा प्रिंट अंक पोष्टाने पाठविण्यात येईल.
6) उत्कृष्ट आणि ओरिजिनल सेल्फी (फोटो) पाठविणाऱ्या सर्धकांना डिजिटल शिक्षक ध्येयचे 51 अंक व्हाट्स ऍपवर पाठविण्यात येईल.
7) दिनांक 5, 12, 19, 26 जूनच्या साप्ताहिक शिक्षक ध्येयमध्ये आपला सेल्फी फोटो राज्यस्तरावर प्रसिध्द करण्यात येईल. हे अंक आमच्या १५३+ व्हॉट्सॲप ग्रुप वर तसेच फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, वेबसाईट, ब्लॉग इत्यादी सर्व ठिकाणी प्रसिद्ध केले जातील.
8) मागील वर्षांचा जुना सेल्फी, कुंडीतील रोपटं नको. कुठलीही बनवेगिरी, खोटेपणा करू नये, केल्यास तो फोटो बाद करण्यात येईल. शिक्षक ध्येयचे उपसंपादक, उपसंपादिका किंवा प्रतिनिधी रोपटं लावलेल्या स्थळाला भेट देऊ शकता.
9) रोपट्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी.
10) या स्पर्धेसाठी कोणतीही फी नाही. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
12) अंतिम निकाल, Lucky Draw द्वारे विजेत्यांची नावे २६ जूनच्या शिक्षक ध्येय अंकात प्रसिद्ध होईल
13) परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहील.
पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत असलेलं तापमान, कमी होणारं पर्जन्यमान, रुसलेला वरुणराजा आणि आग ओकणारा सूर्य.. या सर्व समस्यांवर वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे. लोकांना झाडं लावण्यासाठी उद्युक्त करणे हाच या मोहिमेचा उद्देश आहे. तसेच झाडाबरोबरच पर्यावरण जनजागृती व संवर्धनाचा हेतू असून निसर्ग वाचवण्यासाठी एक निकोप स्पर्धा घडवून आणणे. प्रत्येक माणसाच्या मनात झाडं लावण्याचा विचार रुजवण्याचा हा एक प्रयत्न असल्यामुळे या स्पर्धेत राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक यांनी उत्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन शिक्षक ध्येयच्या संपादकीय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
एक रोपटं लावा’ त्या रोपट्यासोबत सेल्फी फोटो काढून खालील ईमेलवर पाठवावा..
किंवा खालील नंबरवर व्हाट्स ऍप करा
74 99 86 80 46
वरील पैकी सेल्फी – फोटो फक्त एकाच ठिकाणी पाठवावा.
Leave a Reply