➰३~जून=दिन विशेष➰
३ जून👇महत्वाच्या👇घटना.
१८१८: मराठेशाहीचा अस्त – शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्य इंग्रजांच्या कडे सोपवले,नंतर इंग्रजानी शनिवार वाड्या वर कब्जा केला आणि तिथे युनियन जॅक फडकला
१८८९: ट्रान्ससिटोनेंटल कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचे काम पूर्ण झाले.
१९१६: महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
१९४०: डंकर्कची लढाई – जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.
१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.
१९४७: हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
१९५०: मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी अन्नपूर्णा या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
१९७९: मेक्सिकोच्याअखातात इहटॉक या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.
१९८४: ऑपरेशन ब्ल्यू स्टार –भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
१९८९: थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लष्कर पाठवले.
१९९८: जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱया त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.
३जून👇जन्म-वाढ दिवस
१८९०: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक बाबूराव पेंटर यांचा जन्म (मूत्यू: १६ जानेवारी १९५४)
१८६५: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९३६)
१८९०: : चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार बाबूराव पेंटर यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९५४)
१८९०: खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९८८)
१८९२: लेखिका तसेच बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८६)
१८९५: चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत के.एम. पण्णीक्कर यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६३)
१९२४: तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा जन्म.
१९३०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म.
१९६६: पाकिस्तानी क्रिकेट कप्तान जलदगती गोलंदाज वासिम अक्रम यांचा जन्म.
३ जून मृत्यू👇पुण्यतिथी
१६५७: मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १५७८)
१९३२: उद्योगपती सर दोराबजी टाटा यांचे निधन. (जन्म:२७ ऑगस्ट १८५९)
१९५६: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचे निधन.(जन्म: १८ मार्च १८८१)
१९८९: इराणी धर्मगुरू आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचे निधन.(जन्म:२४ सप्टेंबर १९०२)
१९९०: इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक रॉबर्ट नोयिस यांचे निधन.(जन्म:१२ डिसेंबर १९२७)
१९९७: चित्रपट व नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचे निधन.(जन्म:११ ऑक्टोबर १९१६)
१९७७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ आर्चिबाल्ड विवियन हिल यांचे निधन.
२०१०: मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक अजय सरपोतदार यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १९५९)
२०१३: जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार अतुल चिटणीस यांचे निधन.(जन्म:२० फेब्रुवारी १९६२)
२०१४: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन.(जन्म:१२ डिसेंबर १९४९)
२०१६: अमेरिकन बॉक्सर मुहम्मद अली यांचे निधन. (जन्म:१७ जानेवारी १९४२)
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Leave a Reply