आज•३•जून•वटसावित्री पौर्णिमा
तीन दिवसीय व्रत
↕️
परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज देह रूपाने अक्कलकोट येथे असताना त्यांचे भक्त त्यांना स्वामी तुम्ही कुठले असे विचारत त्यावेळी ते वडाच्या झाडाकडे बोट दाखवून वट वट नगर मूळ झाड असे म्हणत यावरूनच या वृक्षाचे ईश्वरीय महत्व लक्षात येते.श्री भगवान दत्तात्रेय रुपी श्री स्वामी समर्थ महाराजांचे कायमस्वरूपी निवासस्थान म्हणजे वडाचे झाड होय.
*वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते. आज ३ जून रोजी या व्रताचा आरंभ आहे.ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही,त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे, असे शास्त्र सांगते.
*🌹🚩 व्रतकथा 🚩🌹*
सावित्रीने यमदेवांकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते.ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली. तेव्हापासून पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे,यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली.तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले,त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाचे ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात.
🌹व्रतपजून,व्रतकथा व🥦पूजनासाठी शुभ मुहूर्त.🌹
↕️
वट सावित्री🥦पूजन मुहूर्त
वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्यलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते.आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे.मात्र शक्यतो तसे करू नये!
🌹🚩वटपौर्णिमा 🚩🌹
संपूर्ण दिवस पौर्णिमा असल्यामुळे सकाळी आपल्या वेळेप्रमाणे वटसावित्री व्रताचा संकल्प करून वडपूजन करावे.
🌹वटसावित्री-३-दिवसांचे व्रत🌹
ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत सुवासिनी महिलांकडून केले जाते. काही महिला तीन दिवसाचे व्रत आचरतात.तीन दिवसांचा व्रतारंभ पौर्णिमेच्या दोन दिवस आधी केला जातो.या व्रताचे तीनही दिवस संपूर्ण दिवस उपास करावा,असे शास्त्र सांगते.मात्र,ज्यांना संपूर्ण तीन दिवस उपास करायला जमणार नाही,त्यांनी दिवसभर उपास करून रात्री सोडावा.तीन दिवसांच्या व्रतामध्ये दररोज वडाच्या झाडाची षोडशोपचार पूजा करावी.मात्र,दररोज वडाचे पूजन करणे शक्य नसल्यास घरी,नित्य-पूजा,जप,नामस्मरण करावे, असे सांगितले जाते.तिसऱ्या दिवशी सकाळी नित्यकर्म,स्नान,देवाची नित्य प्रार्थना,तुलसीपूजन झाल्यानंतर वडाच्या झाडाजवळ जावे.
🌹वटसावित्री🙏पूजन🌹
पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीनेही वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे.प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसल्यास वडाच्या झाडाची प्रतिमा घ्यावी.एका चौरंगावर तिची स्थापना करावी.’व्रताचरणाचा संकल्प करावा’;त्यानंतर देवतांचे आवाहन करावे.तुप,दूध,मध, दही आणि साखर यांचे मिश्रण असलेले पंचामृत अर्पण करावे.त्यानंतर शुद्ध पाणी अर्पण करावे. हळद-कुंकू,फुले,फळे अर्पण करावीत.धूप,दीप,नैवेद्य अर्पण करावा.आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटावा. पूजा झाल्यानंतर……
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी l
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात् ll
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते l
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ll असे म्हणत सावित्रीची प्रार्थना करावी….यानंतर, वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन: l_
वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ll
👆हा मंत्र म्हणावा👆
🌹वटसावित्रीची कथा🌹
↕️
पौराणिक कथेनुसार,भद्र नामक देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता.त्याला सावित्री नावाची कन्या होती.सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता.शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहीत राजा जंगलात राहत होता.भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहिती होते. त्यामुळे सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल्ला सावित्रीला दिला.पण सावित्रीने ते मान्य केले नाही.तिने सत्यवानाशी विवाह केला.व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले.
🌹यमराज व सावित्री🌹
↕️
सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता, सावित्री त्याच्याबरोबर गेली.लाकडे तोडतां तोडतां त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला.यमराज तिथे आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले.सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली.यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले,पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला.अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले.तिसरे वरदान मागताना,मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी व्हावी,अशी इच्छा व्यक्त केली.यमराजाने नादात तथास्तु म्हटले.तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले.
सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले,म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.~~~~~
मनशक्ती-वटसावित्रीचे व्रत करावे का ?
↕️
आज मामांच्या हातात वसंता सापडला होता..बुद्धिनिष्ठ वसंताची बायको पद्मा,दुसऱ्या दिवशीच्या वटसावित्रीच्या व्रताची यादी मोलकरणीला सांगत होती,तेव्हा मामा हजर होते.मामांनी गंभीरपणे विचारलं, “पद्मा नवऱ्याबद्दल तुम्ही बायका काय प्रार्थना करता ?”
पद्मा म्हणाली:मी प्रार्थना करते की,मला अहेवपणी मरण दे. म्हणजे हे जीवंत असतानाच मी मरुन जाऊ दे. त्यांच्या मागून उरायला नको.”
“जनातली व मनातली प्रार्थना उलटसुलट असते.असंच ना?” मामा मिस्किल गंभीरपणाने म्हणाले.आणि मग उत्तर ऐकायला न थांबता त्यांनीच आपला प्रश्न पुढे दामटला, “बरं दुसरी प्रार्थना कोणती ?”
पद्मा आवंढा गिळून म्हणाली, “जन्मोजन्मी हाच पती”
मामानी आपली गंभीरता अधिक गडद केली.आणि म्हणाले:यापैकी निदान एक प्रार्थना तरी ढोंगी मूर्खपणाची आहे”
पद्माच्या चेहऱ्याचा चंबू झाला.तेव्हा मामांना आपला खुलासा करणं भाग पडलं. ते म्हणाले, “असं पहा.तू अहेवपणी मरणार,म्हणजे या जन्मी पहिल्यांदा तू मरणार. तसं झालं,म्हणजे पुढच्या जन्मी तू पहिल्यांदा जन्माला येणार आणि•वसंत तुझ्यामागून जन्माला येणार. पुढल्या जन्मी तू मोठी तो लहान तर मग तुमचं लग्न कसं होणार?”
पद्माच्या चेहऱ्याचा चंबू गोंधळला.तिनं वसंताकडे पाहिलं,पण नवऱ्याकडून कुमक येण्याचं काहीच चिन्ह दिसेना. कारण बुद्धिवादी म्हणणाऱ्या,वसंतानं स्वतःसाठी चाललेली पद्माथी प्रार्थना कधी आडवली नव्हती.मामा पद्माला आणखी डिवचत म्हणाले,”एक तर तुला प्रार्थना अशी करायला हवी. एक वेळ यांच्याशी लग्न झालं तर झालं.पुन्हा पीडा नको.
पद्मानं कानावर हात ठेवले.किंचितशी किंचाळली आणि म्हणाली, “बोलू नका, बोलू नका. मग मी प्रार्थना करु तरी काय ?”
संबंध संवादात,मामा आताच “गांभीर्य गडा” वरुन खाली उतरले आणि विस्फारलेल्या तोंडाने पद्माला म्हणाले,”नवऱ्याला सांग,उठ सूट बुद्धिवादाच्या गप्पा मारु नको.बुद्धिवाद अवश्य राखावा.पण अवश्य तेथे त्याची मर्यादा मानावी, वटवृक्ष हा भक्कम आधाराचं जीवनचिन्ह आहे.त्याच्या साक्षीनं आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी शक्ती मागावी.~~
🌳वटसावित्री 🙏पौर्णिमा🥦
आज,”वटपौर्णिमा” च्या निमित्ताने,वटवृक्षांना प्रणाम!
तसेंच
‘दमदार,कणखर,खंबीर,पतीव्रता “सावित्रीं माऊली” ज्या कुठे ही प्रकाशझोतात नाहीत आणि प्रसिद्धी पासून दूर आहेत. पण, ‘आदर्श परिवाराच्या’ खऱ्या सुत्रधार आहेत अश्या सर्वा सावित्री माऊलींना वटपौर्णिमाच्या ‘हिरव्यागार’शुभेच्छा-आपले सौभाग्य सदासर्वदा अबाधित राहो!~~~~
श्री वट सावित्री👇आरती
अश्र्वपती पुसता झाला l नारद सांगताती तयाला ll
अल्पायुषी सत्यवंत l सावित्री नें प्रणीला ll
आणखी वर वरी बाळें l मनीं निश्र्चय जो केला ll
आरती वड राजा ll१ll दयावंत यमदूजा ll
सत्यवंत ही सावित्री l भावे करीन मी पूजा ll
आरती वड राजा lधृl ज्येष्ठ मास त्रयोदशी ll
करिती पूजन वडाशी l त्रिरात्र व्रत करुनिया ll
जिकीं तूं सत्यवंता शी || आरती वड राजा ll २ ll
स्वर्गावरी जाऊनिया l अग्निखांब कचळीला ll
धर्मराज उचकला l
हत्या घालील जिवाला ll
येई गे पतीव्रते पती नेइ गे आपुला ll
आरती वड राजा ll३ ll जाऊनीया यामापाशी ll
मागतसे आपल्या पती l चारी वर देऊनीया ll
दयावंत द्दावा पती आरती
वड राजा ll ४ ll
पतिव्रते तुझी कीर्ती l ऐकूनी नारी ll
तुझी व्रते आचरती ll
तुझी भुवने पावती l
आरती वड राजा ll५ll पतिव्रते तुझी स्तुती ll
त्रिभुवनी ज्या करिती l स्वर्गी पुष्प वृष्टी करुनियाll
आणिलासी आपुला पती l
अभय देऊनीया ll
पति व्रते तारी त्यासी l
आरती वड राजा ll
🥦वट पौर्णिमा↔️काय आहे: ७ जन्माचे रहस्य ?
↕️
सात जन्म हाच पती मिळवा यावरून खूप विनोद होत आहेत
या ७ जन्म मागणीमधे पुढच्या जन्माचा संबंध नसावा आणि तो होणार का नाही हे माहिती नसते.माणसाचा मिळेल का ? माहित नाही.हीच बाई पुन: ओळखायची कशी ? अशा निरर्थक बाबी आपल्या शास्त्रात नाहीत.
मग काय असावे ७ जन्म हे कोडे ?
ही जीवशास्त्रीय भूमिका आहे.
शरीर शास्त्र सांगते की आपल्या शरीराची रचना राज्यसभेसारखी असते. काही पेशी मरतात काही नवीन जन्माला येतात. शरीर सतत बदलत असते आणि तरीही अखंड वाटते.
या शरीरातील एकूण एक पेशी बदलायला काळ लागतो तो १२वर्षे. म्हणून तप करायचा काळ १२ वर्षे.
१२ वर्षांनी आपले शरीर पूर्ण बदलत असते. जणू एक नवा जन्म.
असे सात जन्म म्हणजे १२×७=८४ वर्षे
पूर्वी लग्न होत १६ व्या वर्षी.
१६ + ८४ = १०० वर्षे
त्यावेळी ती नवविवाहिता प्रार्थना करायची की सात जन्म हाच पती भेटो
अर्थात
पती _ १६+८४=१००_ वर्षे जगो !!!
वटसावित्रीचे👇व्रत:
सावित्री हीने ईश्वराकडून मृत झालेल्या पतीचे शरीर भरपूर प्राणवायू देणाऱ्या वट ह्या वृक्षाखाली ठेवून त्याचेकरिता पूर्ण आयुष्य/ जन्म मागितला व आयुष्य त्याकाळी १०० वर्षे एवढे होते
पतीच्या शतायुत्वाची कामना आहे सात जन्म.
पुढच्या जन्माचा तसा काही संबंध नाही, सावित्री हीने असे मागितले नव्हते.
((विद्यावाचस्पती श्री. स्वानंद पुंड यांच्या विवेचनावरून !!!))
🌳🥦🌳🥦🌳🥦🌳🥦
ll🥦वड🌳वटवृक्ष🥦ll
शास्त्रीय👇नाव
Ficus benghalensis
इंग्लिश👇नाव
Banyan
#👌उपयोग👌#
↕️
स्त्रियांच्या अनेक आजारांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने औषध म्हणून उपयोगी पडतो.
👉मासिक पाळीच्या अनेक विकारांमध्ये उपचारासाठी वडापासून तयार केल्या औषधीचा उपयोग करतात.वडाचा तुरट रस आणि थंड गुणधर्म यामुळे स्त्रियांच्या या दोन्ही विकारात याचा अतिशय चांगला उपयोग होतो.
👉वडाच्या चिकाचा उपयोग विविध प्रकारच्या संधीवातावर उपचारासाठी करतात.
आमवातामध्ये वडाचा चीक तसेच वडाची पाने ही लेप स्वरुपात उपयुक्त ठरतात.
स्त्रियांमध्ये केस गळण्याचे प्रमाण बऱ्याचदा आढळते.केस गळण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये केसांना रोज तेल न लावणे,आहारामध्ये तिखट आंबट खारट पदार्थ जास्त प्रमाणात घेणे,रात्रीचे जागरण,अतिशय चिंता करणे,चिडचिड करणे अशी अनेक कारणे केस गळतीला कारणीभूत ठरतात,म्हणून वडाच्या पारंब्यांनी सिद्ध केलेले तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल केसांना लावण्यासाठी वापरतात. तसेच या तक्रारीसाठी पोटातूनही वैद्यकीय सल्ल्याने औषधे घ्यावी लागतात,विशेष करून केशवर्धक आणि पित्तशामक औषधांचा केसगळतीवर चांगला उपयोग होतो.
गर्भिणी मध्ये होणारा वडाच्या अंकुराचा उपयोग हा खूपच चांगला आहे.त्याचा उपयोग गर्भाच्या निरोगी आणि उत्तम वाढीसाठी केला जातो.
पूर्ण वाढलेले वडाचे झाड हे एका तासाला साधारण सातशे बारा किलो इतक्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडते.
वडाच्या झाडाखाली तुम्ही जितक्या जास्त वेळ बसता तितका जास्त वेळ तुमच्या शरीराला आवश्यक असा ऑक्सिजन तुम्हाला मिळतो.
वडाच्या काटक्यांचा उपयोग हा होमहवनामध्ये आणि यज्ञामध्ये समीधा म्हणून करण्यात येतो.तसचं वडाच्या प्रत्येक फांदी,पारंबी आणि पानामधूनही नवीन वटवृक्ष जन्माला येतो,त्यामुळे या वृक्षाला अक्षयवट असं म्हणतात.त्यामुळेच वटपौर्णिमेला वडाचं पूजन केलं जातं.
वडाचा चीक हा दातदुखी,संधीवात तसेच तळपायाच्या भेगांवर फायदेशीर ठरतो.
वडाच्या सालीचा काढा हा मधुमेहावर गुणकारी ठरतो.
विंचवाचे विष काढण्यासाठी सुध्दा याचा उपयोग करून घेता येतो.तसेच पायावर भिंगरी अथवा चिखल्या झाल्यास, तुम्ही वडाचा चीक लावू शकता.
तुमच्या शरीरात अचानक लचक भरल्यास किंवा सांधे दुखत असल्यास,वडाची पानं लावून थोडी गरम केल्यास, त्या दुखणाऱ्या भागावर लावा,असं केल्याने सांधे मोकळे होऊन बरे होतात.
ताप कमी होण्यासाठी वडाच्या झाडाच्या पारंब्यांचा रस देतात,यामुळे घाम येऊन शरीरातील ताप निघून जाण्यास मदत होते.
पोटात जंत झाल्यास, पारंब्याचे कोवळे अंकुर वाटून त्याचा रस देण्यात येतो,तसच तुम्हाला आव अथवा अतिसार झाल्यास, तुम्ही ताकामध्ये मिसळून हे घेतल्यास लवकर बरं होतं.
झाडापासून पंच्चवलकल चूर्ण,पंच्चवलकल कशाय त्याचबरोबर वट जतदी तेल अशी विविध प्रकारची औषधे तयार केली जातात,त्यांचा उपयोग योग्य सल्ल्यानुसार अनेक व्याधींमध्ये हे केला जातो.
अशाप्रकारे स्त्रियांच्या अनेक विकारांमध्ये हे उपयुक्त असलेले हे वडाचे झाड नक्कीच पूजनीय आहे हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे.
चेहरा उजळवण्यासाठी तुम्हाला वडाच्या पानांचा उपयोग करून घेता येईल. वडाची ५-६ पानं घ्या आणि त्यामध्ये साधारण १०-२० ग्रॅम लाल डाळ मिक्स करून वाटून घ्या. त्यानंतर ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा,तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची समस्या असेल तर यामुळे बरी होते.
तुम्ही जर वडाची पिकलेली पानं,जास्वंदीची पानं आणि लाल चंदन पाण्यात एकत्र करून वाटलं आणि त्याची पेस्ट चेहऱ्याला लावलीत तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स निघून जाण्यासही मदत होते.
तिसरा उपयोग म्हणजे तुम्ही पिकलेली वडाची पानं घ्या,त्यामध्ये कमळाचं फूल आणि केशर थोडं घालून पेस्ट बनवून घ्या,आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावा,यामुळे तुमचा चेहरा अधिक उजळतो आणि चमकदार बनतो.
कानाच्या समस्या असतील तर त्यावरदेखील तुम्हाला वडाच्या चीकाचा उपयोग करून घेता येतो. त्यासाठी तुम्ही काही थेंब वडाचा चीक घ्या त्यामध्ये मोहरीचं तेल मिक्स करा. याचे २-२ थेंब तुम्ही कानामध्ये घाला.यामुळे तुमच्या कानात गेलेले किटाणू मरून जाण्यास मदत होते,तसेच तुम्हाला कमी ऐकायला येत असेल तर हे किटाणू मेल्याने तुमचे कानही व्यवस्थित साफ होतात आणि समस्या सुटण्यास मदत होते.
वातावरण बदलतं तसं बऱ्याच जणांना नाकातून रक्त येण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. विशेषतः थंडीच्या दिवसात. मग अशावेळी नक्की काय उपाय करायचा याची कल्पना नसते.तर यावर तुम्ही नक्कीच घरच्या घरी उपचार करू शकता. ताकासह तुम्ही वडाच्या मूळाची साधारण ३ ग्रॅम पावडर मिक्स करा.हे मिश्रण तुम्ही प्यायलात तर तुमच्या नाकातून येणारं रक्त थांबवण्यास याची मदत होते,सर्वात सोपा आणि लवकरात लवकर रक्त थांबवण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
विशेष टिप: कोणतेही नैसर्गिक उपचार करतांना आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने उपचार करावा!
किती प्रमाणात रोग आहे व कीती प्रमाणात औषध घेण्याची गरज आहे हे वैद्यच सांगेल..!
स्वतःच स्वतःवर उपचार करु नये.❎.
नाही तर “करायला गेले काय आणी वर झाले पाय” अशी अवस्था होईल..
🥦🥦🥦🌳🌳🥦🥦🥦
ll🥦शुभम्🙏भवतु🥦ll
🌹सर्वांना वट सावित्री पोर्णिमेच्या शुभेच्छा🌹
🚩——🚩——🚩———🚩——–🚩—-🚩
🫶वटपौर्णिमा🫶
सण वटपौर्णिमाचा
महिलांच्या जिव्हाळ्याचा l
सावित्रीच्या पुण्याईने
प्राण आणला पतीचा ll
फेरे वडाला मारुन,
धागा प्रेमाचा गुंफाया l
आशीर्वाद घेऊनीया,
सौभाग्याचे दान मागूया ll
सावित्रीची आख्यायिका,
पुराणात लिहलेली l
वैज्ञानिक दृष्टिकोनाची,
बाजू मनाला पटली ll
अति उपयुक्त असे,
झाड आपले वडाचे l
आयुर्वेदिक महत्व,
आहे किती ते गुणाचे ll
वृक्ष लावूनी आपण,
संवर्धन करणे महत्वाचे ll
पर्यावरणाचा समतोलपणा,
ठेवू यानिसर्गाचे ll
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
Leave a Reply