आज जागतिक दूरसंचार दिन. दरवर्षी हा दिवस संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो.इ.स. १८६५ साली आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना करण्यात आली होती.दूरसंचारची महत्व तसचं त्याची जागरूकता पसरविण्यासाठी दर वर्षी १७ मे ला जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्यात येतो. दूरसंचाराच्या क्रांतीमुळे आज विश्वभर खूप मोठ्या परमाणात बद्दल घडून आले आहेत.दूर असलेल्या व्यक्ती सोबत संपर्क करणे शक्य झाले आहे. पृथ्वीवर घडलेला हा एक अविस्मरणीय बदलच म्हणव लागेल.
आज जागतिक उच्च रक्तदाब (World Hypertension Day)आहे.
याव्यतिरिक्त,आज इतिहास काळात ब्रिटीश कालीन भारतातील सर्वात मोठी घटना घडली होती. मराठा आणि ब्रिटीश सरकारच्या इस्ट इंडिया कंपनी यांच्यात सात वर्षांपासून सुरु असलेले पहिले मराठा- इंग्रज युद्ध महादजी शिंदे यांच्या मध्यस्थीने सालबाईचा तह करून संपले. हे युद्ध जवळपास सात वर्षे सुरु होत.
याशिवाय, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहासात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनां जाणून घेणार आहोत. तसचं, जगातील काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन आणि त्यांचे शोधकार्य याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या १७ मे रोजी येणारे दिनविशेष –
१७ मे- महत्त्वाच्या घटना
👇
१७५६: ब्रिटन देशाने फ्रांस देशाविरुद्ध युद्ध पुकारले.
१८६५: आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना करण्यात आली होती त्याची स्मृती म्हणून सर्वप्रथम विश्व दूरसंचार दिवस साजरा करण्यात आला.
१९४९: भारताने राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
१९९०: जागतिक आयोग्य संघटनेने आजारांच्या यादीमधून समलैंगिक मानसोपचार आजारास काढून टाकले.
२००४: अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स हे राज्य समलिंगी लग्नाला कायदेशीर परवानगी देणारे जगातील सहावे कार्यक्षेत्र बनले.
१७मे-जन्मदिन,जयंती,वादिवस.
👇
१७४९: देवीच्या लसीचे जनक इंग्रज शरीरशास्त्रज्ञ डॉ. एडवर्ड जेन्नर यांचा जन्मदिन.
१८६५: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय महाराष्ट्र राज्यातील मराठ्यांच्या तीन खंडाचा इतिहास इंग्रजीमध्ये लिहणारे महाराष्ट्रीयन इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्मदिन.
१८७८: मुंबई प्रांताचे पहिले भारतीय राज्यपाल व महाराज हरि सिंह यांच्या कारकिर्दीतील जम्मू-काश्मीर प्रांताचे पंतप्रधान व जोधपुर चे दिवाण कपुरथला राजघराण्याचे राजा हरनाम सिंह यांचे पुत्र महाराजा सिंह यांचा जन्मदिन.
१८९५: भारतीय आसामी इतिहासकार, नाटककार,निबंधकार आणि लघुकथा लेखक नकुलचंद्र भुयान यांचा जन्मदिन.
१९३४: अमेरिकन इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील निवृत्त व्यावसायिक तसचं, अमेरिकन संगणक कंपनी ॲपल चे सहसंस्थापक रोनाल्ड वेन यांचा जन्मदिन.
१९४५: भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज व माजी भारतीय क्रिकेटपटू भागवत सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचा जन्मदिन.
१९५१: सुप्रसिद्ध भारतीय गझल गायक पंकज उदास यांचा जन्मदिन.
१९७९: सुप्रसिद्ध भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा जन्मदिन.
१७ मे – मृत्यू,पुण्यतिथी, स्मृतदिन.
👇
१९७२: पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्र राज्यातील शिल्पकार रघुनाथ कृष्णा फडके यांचे निधन.
⚓⚓⚓⚓⚓⚓⚓⚓⚓⚓⚓⚓
Leave a Reply