श्री. कैलास भाऊलाल बडगुजर यांना काव्य किरण मंडळाच्या ५१ व्या वर्धापनदिनी स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले – श्री. उमेश बडगुजर, सुरत

काव्य किरण मंडळाचा ५१ वा वर्धापन दिन हा उत्साहात संपन्न. कल्याण येथील अभिनव विद्यामंदिराच्या डॉक्टर आनंदी गोपाळ सभागृह येथे काव्य किरण मंडळ कल्याण या मंडळाचा ५१ वा वर्धापन दिन व सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी प्रवीण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या आनंद व उत्सवात संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम कवी हेमंत राजाराम हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. कुमारी श्रीनिधी वैष्णव हिने सुमधुर आवाजात शारदा वंदन सादर केले. मान्यवरांच्या शुभहस्ते काव्य किरण मंडळाच्या ५० वर्षीच्या वाटचालीचा आढावा घेणारी सुवर्णगाथा मे १९७३ते मे २०२३ ही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या सांजवात या कविता संग्रहाचे लोकांपण तर विजय चिपळूणकर यांच्या वृतांकित या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. वृतांकित या काव्य संग्रहावर सुखदा कोरडे, स्वाती नातृ, दया धोगे व ज्योरस्ना चिपळूणकर यांनी तर सांजवात या काव्य संग्रहदार ज्योती वैद्य शेटे यांनी आपली समीक्षापर मनोगत व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले कवी राजीव जोशी, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, कल्याण वैभव चे संपादक विश्वास कुलकर्णी, सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांचा सन्मान करण्यात आला.तसेच मंडळाचे जेष्ठ सभासद गझलकार वा. न. सरदेसाई, कादंबरीकार जनार्दन ओक व श्रीकांत पाठक, कवी राजेंद्र वैद्य, यशवंत वैद्य, माधुरी वैद्य, आशा धकिते,अरविंद बुचकर यांच्यासह वर्षभरात चांगली साहित्यक सामाजिक कामगिरी केलेल्या कवी प्रवीण देशमुख, सागर राजे निंबाळकर, सुनील म्हसकर, कैलास भाऊलाल बडगुजर, स्वाती नातू आदी सभासद कवीचा विशेष सत्कार व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हेमंत राजाराम यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना म्हटले की कविता लिहिणे ही एक जबाबदारी आहे वृत्त सांभाळता आणि यमक जुळवता येणे म्हणजे कविता नव्हे. कवितेचा आत्मा जोवर गवसत नाही तोवरचा खटाटोप म्हणजे रियाज असतो. वृत्ताचे वृत्तींत रूपांतर झाल्यावर कविता सापडते. अरुपाचे रूप दाखवण्यासाठी क्षमता कवीने प्राप्त केल्यास कवी समाजाचे प्रबोधन करून सामाजिक क्रांती घडवून आणू शकतो. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव सागर राजे निंबाळकर यांनी केले तर सदस्य सुनील म्हसकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपाध्यक्ष निलांबरी बापट यांनी आभार मानले तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अभिनव विद्यामंदिराचे मुख्याध्यापक गीते सर व छत्रपती शिवाजी मंडळ कल्याण यांच्या सहकार्याने आणि सतीश केतकर, मनोज केडकर , मंगला कांगणे, कैलास भाऊलाल बडगुजर, प्रतिभा देशमुख, स्वाती जोशी, संदीप कुलकर्णी, श्रीधर खं डापूरकर व इतर सभासद यांच्या विशेष मेहनतीने यशस्वीपणे संपन्न झाला. स्मरणिका जुळवणी व छपाई मध्ये कैलास बडगुजर यांची महत्त्वाची मदत झाली श्री. कैलास भाऊलाल बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*