१७ मे रोजी जगभरात वर्ल्ड हायपरटेन्शन डे (जागतिक रक्तदाब दिवस) म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड हायपरटेन्शन लीगकडून याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या दिवशी विविध उपक्रम राबविले जातात.अनेकांना या आजाराबाबत माहिती नसते, आणि मग ते वेळेवर यावर उपचार करु शकत नाही. अनेकांना तर हा काय आजार आहे हेही माहिती नसतं.
विचित्र जीवनशैली (लाईफस्टाईल),जेवणाची अनियमितता,अवेळी जेवण आणि स्ट्रेस यामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात.यातील एक समस्या म्हणजे उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन म्हणजे हाय बीपी! ‘हायपरटेन्शन’ आता एक प्रमुख समस्या बनत चालली आहे,यामुळे देशातील लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत असून,या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांची ओळख पटत नसल्याने हा आजार आणखी बळावतो.डॉक्टरांनुसार ही समस्या तणाव,खाण्या- पिण्यातील बदल,दारु, तंबाखू,किडनीशी निगडीत आजाराने किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाल्याने होऊ शकतो.
आज घडीला देशांतील अति उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जीवनशैलीमध्ये होत असलेले बदल आणि आयुष्याला आलेला वेग हे यामागील प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असून हृदयविकाराशी संबंधित आजार जडण्याची शक्यता असते.अशात जनजागृती आणि उपचाराबाबत योग्य माहिती लोकांमध्ये पोहचणे गरजेचे आहे.
उच्च रक्तदाब म्हणजे काय?
↕️
प.रत्येकाचे हृदय शरीरातील सर्वच अंगाना रक्त पोहोचवण्याचं काम करतं.ब्लड फ्लो दरम्यान तुमचं हृदय एक प्रेशर तयार करतं.या दबावालाच ब्लड प्रेशर म्हटलं जातं.याने तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह वेगाने होतो. अशावेळी तुमच्या हृदयाला अधिक काम करावं लागतं.सामान्य ब्लड प्रेशर १२०/८० एमएमएचजी इतकं असतं. जेव्हा ब्लड प्रेशर १४०/९० एमएमएचजीपेक्षा जास्त झालं असेल तर तुम्ही “हायपरटेन्शनने ग्रस्त” असण्याची शक्यता आहे.
उच्च रक्तदाबामुळे हृदयाचे नुकसान:हायपरटेन्शनचे कोणतंही स्पष्ट लक्षण दिसून येत नाही. त्यामुळे अनेकजण याकडे लक्ष देत नाहीत.यामुळे केवळ हृदयालाच नुकसान होतं असं नाहीतर डोळ्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या नसांनाही धोका होऊ शकतो.ज्यामुळे तुमची दृष्टी कमजोर होण्याचीही शक्यता असते. तसेच यामुळे किडनीवरही परिणाम होतो._
हायपरटेन्शन ची कारणे
१)धुम्रपान,मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारच्या तंबाखू उत्पादनाचे सेवन करणे म्हणजे उच्च रक्तदाबाला आमंत्रण देणे होय!
२)सतत तणावमयुक्त/ताणमय जगणे म्हणजे रक्तदाब वाढण्याची लक्षणे सुरू होणार.!
३)मीठाचं अधिक सेवन,बाहेरचं जेवण किंवा जंक फूडमध्ये मीठ जास्त असल्याने अनेकांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो,त्यामुळे खूप जास्त मीठ खाऊ नये.
४)व्यायाम न केल्याने तुमच्या शरीरातील नसा प्रभावित होऊ शकतात,जर त्या कमजोर झाल्यास रक्तदाब वाढू शकतो,त्यामुळे दररोज नित्यनेमाने व्यायाम करावा.!
उच्च रक्तदाबाची👇लक्षणे
⚓छातीत दुखणे,छाती भरुन येणे,श्वास घ्यायला त्रास होणे.
⚓खूप जास्त थकवा जाणवणे.
⚓मान,पाठ,हात किंवा खांदे दुखणे,सतत खोकला येणे.
⚓भूक मंदावणे-कमी लागणे,सतत डोके दुखणे,छातीत जडपणा येणे.
⚓अचानक घाम येणे वगैरे वगैरे..!
उच्च रक्तदाबावर👇उपाय!
⚓जेवणात सकस आहाराचा समावेश करा!
⚓हिरव्या भाज्या अधिक खायला हव्यात. सतत बाहेरचं खाणं टाळा. ⚓रोज नियमीत व्यायाम करा._
⚓एकाच जागेवर जास्तवेळ न बसता शरीराची हालचाल वाढवा.
⚓मद्यपान कमी करा.(टाळा)
⚓धुम्रपान करु नका.
वयाच्या पन्नाशीपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब ११० ते १४९ असावा,तर डायास्टोलिक रक्तदाब नव्वदपेक्षा कमी असावा. सिस्टोलिक रक्तदाब १४० पेक्षा जास्त आणि डायास्टोलिक रक्तदाब नव्वदपेक्षा जास्त असेल तर संबंधित व्यक्तीला अतिउच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) असल्याचे निदान केले जाते. तपासणीतून हे समोर येते.
👇काळजी👇घ्या👇
👍वयाची पस्तिशी ओलांडल्यानंतर दरमहा रक्तदाबाची तपासणी करणे आवश्यक आहे.
👍अशा रुग्णांनी नियमित उपचार घेणे आवश्यक आहे.
👍उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी आहाराच्या वेळांचे नियमन,मीठाचे प्रमाण कमी करायला हवे.
👍दिवसभरात किमान अर्धा तास चालणे किंवा व्यायाम करणे गरजेचे आहे.
👍हा आजार केवळ औषधाने नियंत्रित राहत नसून यासाठी जीवनशैलीशी निगडित आहार,व्यायाम इत्यादी बदलही आवश्यक आहेत.
➰➰➰➰➰
उच्च रक्तदाब /High Blood Pressure आणि आयुर्वेद-१
उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशर ही एक गंभीर समस्या आहे. दीर्घकाळ उपचार न केल्यास यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो. त्याची कोणतीही विशिष्ट लक्षणे नाहीत आणि या कारणास्तव ब-याच प्रकरणांमध्ये रुग्णाला वर्षानुवर्षे या रोगाची माहितीच नसते. या कारणास्तव हायपरटेन्शनला (hypertension) सायलेंट किलर असेही म्हणतात.
सध्याच्या जगात आजार तसे अनेक आहेत पण सर्वाधिक समस्या ही बीपीची अर्थात हाय ब्लड प्रेशरची (high blood pressure) आहेत. बीपी म्हणजे उच्च रक्तदाब होय. या आजाराला सायलेंट किलर (silent killer BP) सुद्धा म्हटले जाते. कारण या आजाराची काही विशेष लक्षणेच नाहीत. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहे ज्यामध्ये या आजाराचे निदान होण्यास खूप काळ गेला आणि जेव्हा निदान झाले तेव्हा कळले की आजार खूप जास्त वाढला आहे.
भारतामध्ये दर 4 पैकी 1 प्रौढ व्यक्ती हा हाय ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त आहे. याबद्दल वेळीच काळजी न घेतल्याने आणि उपचारांकडे दुर्लक्ष केल्याने मृत्यू सुद्धा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा ब्लड प्रेशर 140/90 mm/Hg पेक्षा जास्त होतो किंवा वाढतो तेव्हा त्याला हाइपरटेन्शन असे म्हणतात.
🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶



Leave a Reply