१२ मे महत्त्वाच्या घटना – बडगुजर. इन

१२ मे महत्त्वाच्या घटना:
१३६४: पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात झाली.

१४५९: राठोड कुळातील राजपूत प्रमुख राव जोधा यांनी जोधपूर शहराची स्थापना केली.

१५५१: अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात झाली.

१६६६: आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात शिवाजीमहाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झली.

१७९७: नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.

१९०९: पुणे येथे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना

१९१५: भारतीय क्रांतिकारक रासबिहारी बोस यांनी जपानी नौका सानुकी मारू यातून प्रवास करून भारत देश सोडून जपान येथे आश्रय घेतला.

१९४१: बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z3 सादर केले.

१९५२: प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.

१९५२: गजसिंग जोधपुरच्या राजेपदी.

१९५५: दुसरे महायुद्ध – संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.

१९६५: सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना ५ चंद्रावर कोसळले.

१९८७: ब्रिटीश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हार्मिस हि युद्धनौका विकत घेऊन भारताने तीला आयएनएस विराट या नावाने दाखल केले.

१९९८: केन्द्र सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरुन वरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.

१९९८: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

२००८: चीनमध्ये ८.० पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपात ६९,००० पेक्षा जास्त लोक मारले गेले.

२०१०: एस. एच. कपाडीया यांनी भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१२ मे जन्मदिवस👇जयंती
१८२०: फ्लोरेंस नाइटिंगेल, आधुनिक शुश्रुषाशास्त्राच्या संस्थापिका; ब्रिटिश परिचारिका.

१८७५: भारतीय हिंदू धर्माचे गाढे गाढे अभ्यासक व कलकत्ता विद्यापीठाचे तत्त्वज्ञ कृष्णचंद्र भट्टाचार्य यांचे निधन.

१८९५: भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९८६)

१८९९: ईंद्रा देवी, भारतीय योगी.

१९०५: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९८३)

१९०७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १९९३)

१९०७: हॉलिवूड अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २००३)

१९२६: भारतीय जनता पक्षाचे माजी कोषाध्यक्ष व राजकारणी तसचं, पश्चिम बंगाल राज्याचे २२ वे राज्यपाल वीरेंन जे. शाह यांचा जन्मदिन.

१९३०: तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.

१९३३: नंदकुमार महादेव नाटेकर उर्फ नंदू नाटेकर, अग्रगण्य भारतीय बॅडमिंटनपटू.

१९४५: भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष, भारताचे माजी मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोनाकुप्पाकटील गोपीनाथन बाळकृष्णन यांचा जन्मदिन.

१९५४: भारतीय राजकारणी आणि तमिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री करुप्पा गौंडर पलानीस्वामी यांचा जन्मदिन.

१९८९: भारतीय क्रिकेटपटू शिख पांडे यांचा जन्मदिन.

१२ मे👇मृत्यू-पुण्यतिथी
१८०९: ब्रिटिश भारतीय सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि व्हिक्टोरिया क्रॉसचे प्राप्तकर्ता जनरल सर ह्यू हेनरी गफ यांचे निधन.

१९७०: नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार नोली सॅच यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर १८९१)

१९९३: भारतीय हिंदी भाषिक कवी शमशेर बहादूर सिंग यांचे निधन.

२०१०: तारा वनारसे, मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका.

२०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक सरत पुजारी यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९३४).
➰➰➰➰➰➰➰➰

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*