८ मे जागतिक थॅलेसेमिया दिवस व जागतिक रेड🩸क्रॉस दिन 🩸🩸🩸- बडगुजर. इन

आज ८ मे जागतिक थॅलेसेमिया दिवसजागतिक रेड🩸क्रॉस दिन
🩸🩸🩸
“प्रथम थॅलेसेमिया दिनाबद्दल जाणून घेऊया! “

“थॕलेसेमिया काय आहे ?
१.)थॅलेसेमिया हा अनुवंशिक रक्ताचा आजार असून तो आईवडीलांपिसून मुलांना होतो.
२.)हा रोग शरीरातील हिमोग्लोबीन ची संख्या कमी करून लाल रक्तपेशी कोशिकाचे उत्पादनवर प्रभाव करतो.
३.) जनुकांच्या (जिन्सच्या) जनुकीय संरचनेत बदल झाल्यामुळे हा आजार उदभवतो.
थॕलेसेमिया प्रमुख लक्षणेः
१.सुस्ती व थकवा येणे.
२.छातीदुखी व डोकेदुखी.
३.श्वास घेणेस त्रास होतो.
४.त्वचा पिवळी पडणे.
५.चक्कर येणे,बेशुध्द होणे.
६.संक्रमणतेस जास्त संवेदनशील.
हिमोग्लोबिन मधील प्रोटिन्स वरून या आजाराची दोन प्रमुख प्रकार पडतात
अल्फा थॅलेसेमिया आणि बीटा थॅलेसेमिया
१.अल्फा थॅलेसेमिया: या प्रकारात रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये अल्फा प्रोटिन आढळत नाही त्यामुळे हिमोग्लोबिन आणि लालरक्तपेशी यांचा आकार लहान आणि अनियमित आढळून येतो.
२.बिटा थॅलेसेमिया: या प्रकारच्या थॅलेसेमिया मध्ये बिटा प्रोटीन आढळत नाही त्यामुळे हिमोग्लोबिन आणि लालरक्तपेशी यांचा आकार अनियमित व लहान होतो.
लालरक्तपेशी आणि त्यामध्ये असलेल्या हिमोग्लोबिनचे प्रमुख कार्य शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा नियमित पुरवठा करणे हे आहे.
थॅलेसेमिया आजाराचे लक्षणांवरून प्रामुख्याने तीन प्रकार पडतात.
१.थॅलेसेमिया मेजर
२.थॅलेसेमिया इंटरमेडिया
३थॅलेसेमिया मायनर .

१. थॅलेसेमिया मायनर:
या आजाराच्या रुग्णामध्ये आजाराची लक्षणे बहुदा दिसत नाहीत. म्हणजेच हे रुग्ण थॅलेसेमिया वाहक असतात.काही वेळेस या आजारामध्ये रक्त अल्पता (ॲनिमिया) या आजाराची लक्षणे दिसतात आणि लालरक्तपेशींचा आकार लहान असल्याचे रक्त तपासणीत दिसून येते. या आजाराची रुग्ण सर्वसामान्य जीवन जगु शकतात.या रुग्णांना सहसा बाहेरून रक्त देण्याची गरज भासत नाही . काही रुग्णांना अधूनमधून बाहेरून रक्त द्यावे लागू शकते पण अशी संख्या तुलनेने खूपच कमी आहे.
थॅलेसेमिया मायनर रुग्ण हा वाहक असून जेव्हा दोन थॅलेसेमिया मायनर मध्ये विवाह होते त्यावेळी त्याना होणाऱ्या आपत्यापैकी प्रत्येक गर्भधारणेच्यावेळी २५% आपत्य थॅलेसेमिया मेजर होण्याची शक्यता आहे तर ५०% आपत्य त्यांच्या आईवडिलांसारखी वाहक अर्थात थॅलेसेमिया मायनर असतात तर २५% आपत्य हि सामान्य असतात.
२.थॅलेसेमिया मेजर-आजाराची लक्षणे : थकवा येणे,चक्कर येणे,श्वास घेण्यास त्रास होणे,दम लागणे,चेहऱ्याच्या व इतर हाडांचा आकार बदलणे,हाडे ठिसूळ होणे, लिव्हरवर सूज येणे,स्प्लिनचा आकार वाढणे, शरीरातील हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी होणे , नवजात अर्भकाची नखे पिवळी पडणे,बालकांची वाढ खुंटने, चेहरा सुकने,सारखे सारखे आजरी पडणे ही प्रमुख लक्षणे थॅलेसेमिया मेजर या आजारामध्ये आढळून येतात.
तसेच थॅलेसेमिया मेजर रुग्णाचे रक्त मायक्रोस्कोप मध्ये बघितले असता लाल रक्तपेशींचा आकार लहान व अनियमित आढळून येतो, लालरक्तपेशीच प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.
थॅलसेमिया मेजर या आजाराची लक्षणे वयाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षी बालकांमध्ये आढळून येतात. भारतात दरवर्षी साधारणतः दहा हजारांहून जास्त थॅलेसेमिया ग्रस्त बालके जन्म घेतात.आपले नको वाटत असलेले दु:खमय आयुष्य व्यथित करीत आहेत.
थॅलेसेमिया ग्रस्त मुलांचं आयुष्य फार जास्त नसून पहिल्या दशकात मृत्यू ओढवू शकतो.नियमितपणे रक्त दिल्यास हि मुले २५ वर्षापर्यंत जगू शकतात.
आधुनिक उपचार पद्धती जसे बोनमॅरो ट्रान्सप्लांट , स्टेमसेल थेरपी यांच्या मदतीने बालक या आजारातून पूर्णपणे बरा होऊ शकतो व सामान्य जीवन जगू शकतो,परंतु सध्या ही उपचार खूप नवीन आहेत व सर्वसामान्य माणसाला परवडण्यासारखे नाहीत.
उपचार: आधुनिक चिकित्सा पद्धतीमध्ये या आजारावर बाहेरून रक्त देणे , फॉलिकऍसिड च्या गोळ्या देणे आणि वारंवार रक्त दिल्यामुळे शरीरामध्ये जमा होणारे लोह शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी चिलेशन थेरपी दिली जाते त्यामध्ये डेस्फेरेल इंजेक्शन , केल्फर,डेसिरोक्स,असुंरा ई.औषधाचां वापर होतो.
टिप: कृपया तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधी घ्यावी.
तसेच बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट, स्टेमसेल ट्रान्सप्लान्ट थेरपी आधुनिक उपचार पद्धती मध्ये उपलब्ध आहेत.

थॅलेसेमिया मेजर रुग्णांसाठी आहार आणि काही नियम: या बालकांनी लोहयुक्त आहार उदा. मासे, मांस अंडी , गुळ, पेंडंखजुर,खारीक,बिट, सफरचंद,डाळींब,पेरू, पालक इत्यादी वर्ज्य करावे अथवा अत्यल्प घ्यावे;तसेच क जीवनसत्त्वयुक्त आहार लिंबू,संत्रा,पपई,आवळा,स्ट्रॉबेरी, द्राक्ष,फुलकोबी इत्यादि खाणे टाळावे कारण क जीवनसत्व अन्नातील लोह घटक आतड्यात शोषून घेण्यासाठी उपयुक्त असते म्हणून लोह काढून टाकायची (चेलेशनची) औषधे सुरू असताना द्यावी.
या रुग्णांसाठी मका,तांदुळ, गहू, सोयावड्या,ओट्स , दूध आणि दुधाचे पदार्थ उपयुक्त आहेत.
चहा आणि कॉफी सेवन केल्यास आहारातील लोहघटक शोषून घेण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या रुग्णांनी चहा,कॉफी सेवन करणे अति उत्तम आहे.

थॅलेसेमिया निर्मुलन उपाय योजना : थॅलेसेमिया या आजाराचे भारतातून समूळ उच्चाटन करण्यासाठी व्यापक जनजागृती करणे.
विवाहपूर्व थॅलेसेमिया मायनर आजाराचे निदान करण्यासाठी CBC, iron studies, haemoglobin electrophoresis, Haemoglobinopathesis (HB ) evaluation, DNA analysis इत्यादी तपासण्या कराव्यात व थालसेमिया मायनर मध्ये विवाह करू नयेत.
थालसेमिया ग्रस्त बालकांच्या आई व वडीलांकडील दोन्हि कुटूंबातील सदस्यांची थालसेमिया मायनर आजाराचे निदान करण्यासाठी CBC, haemoglobinopathesis (HB) evaluation test , haemoglobin electrophoresis आणि DNA analysis test ई तपासण्या कराव्या.
रक्ताच्या नात्यात(उदा मामाचा मुलगा अत्याची मुलगी ) विवाह करू नयेत.
या उपाययोजना केल्यास या आजराचे भारतातून समूळ उच्चाटन शक्य आहे.
हा अनुवांशिक आजार असून गुजराती,ब्राम्हण,सिंधी, पंजाबी, बोहरा आणि मुस्लिम या जातीमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे या जातीतील लोकांनी तसेच एकंदर सर्वच भारतीयांनी विवाह पूर्वी जन्मकुंडली जुळविण्यापेक्षा थालसेमिया, हिपॅटेटीस बी, एच आय व्ही इत्यादी तपासण्या करून आरोग्याची कुंडली जुळविल्यास भविष्यात या सर्व आजारांवर मात करणे शक्य आहे.
➰➰🩸🩸🩸➰➰


: आज जागतिक🩸रेडक्रॉस दिन!

रेडक्रॉस दिन हा रेड क्रिसेंट डे म्हणून ओळखला जातो दरवर्षी ८ मे रोजी साजरा केला जातो,ही तारीख रेडक्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीचे (आयसीआरसी) संस्थापक हेनरी दुनंट यांची जयंती आहे,तो नोबेल शांतता पुरस्कार प्राप्तकर्ता आहे. त्यांचा जन्म ८ मे १८२८ रोजी झाला होता.

हा त्यांच्या तत्त्वांचा वार्षिक उत्सव आहे. हा दिवस रेडक्रॉस सोसायटीतर्फे सर्व देशांमध्ये साजरा केला जातो. हे लोकांच्या हितासाठी काम करते.वर्ल्ड रेडक्रॉस सोसायटीत अन्नटंचाई, नैसर्गिक आपत्ती, युद्धे तसेच साथीच्या आजारांची तरतूद आहे.
वर्ल्ड रेडक्रॉस डे ची थीम ‘एकत्र आम्ही अवरुद्ध’ आहोत!

या जागतिक रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट डेनिमित्त आम्ही आपला दीर्घ प्रवास साजरा करतो आणि आमच्या मानवतावादी अभियानाबद्दलच्या आपल्या बांधिलकीची पुष्टी करतो.

जागतिक रेडक्रॉस दिन:इतिहास
पहिला रेडक्रॉस दिन ८ मे १९४८ रोजी साजरा करण्यात आला.
दुसर्‍या महायुद्धात १९४६ मध्ये टोकियोचा प्रस्ताव अंमलात आला. वार्षिक उत्सव होण्याची शक्यता ‘लीग ऑफ रेडक्रॉस सोसायटीज’(एलओआरसीएस) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने विचारली,ज्यांना नंतर आंतरराष्ट्रीय महासंघाच्या रेडक्रॉस सोसायटीच्या जनरल असेंब्ली म्हणतात.

दोन वर्षांनंतर ८ मे १९४८ रोजी रेडक्रॉसचे संस्थापक हेनरी दुनांट यांची जयंती.

दरवर्षी जागतिक रेडक्रॉस दिन साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारला गेला.
१९८४. मध्ये अधिकृतपणे त्याला “वर्ल्ड रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट डे” असे नाव देण्यात आले.
ह्या दिवसाचे अधिकृत शीर्षक काळानुसार बदलले आणि १९८४ मध्ये वर्ल्ड रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट डे बनले.

रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीची तत्त्वे:
मानवता: जिथे जिथे जिथे अस्तित्वात असेल तेथे सर्व मानवी गैरसोय टाळण्यासाठी आणि ते नष्ट करण्यासाठी जीवनाचे रक्षण करण्यासाठी, प्रत्येकाचे आरोग्य आणि त्यांच्याबद्दल आदर असल्याचे सुनिश्चित करा. हे लोकांमध्ये परस्पर समन्वय, मैत्री आणि सहकार्यास प्रोत्साहित करते.

निष्पक्षता: हे राष्ट्रीयत्व, वंश, धार्मिक श्रद्धा, वर्ग किंवा राजकीय मतांच्या आधारे कोणताही भेदभाव करत नाही. म्हणूनच, त्यांच्या गरजेनुसार लोकांना मदत करते.

तटस्थता: प्रत्येकजण मदत पुरवण्यात तटस्थ राहणे आणि कोणत्याही राजकीय, वांशिक, धार्मिक, वैचारिक बदलांच्या आधारे भेदभाव न करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.

स्वातंत्र्य: राष्ट्रीय संस्था, त्यांच्या सरकारांच्या मानवतावादी सेवेतील सहाय्यक आणि आपापल्या देशांच्या कायद्यांच्या अधीन असताना त्यांनी नेहमीच त्यांची स्वायत्तता कायम ठेवली पाहिजे जेणेकरून ते चळवळीच्या तत्त्वांनुसार कार्य करण्यास सक्षम असतील. चळवळ स्वतंत्र आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*