छत्रपती शाहू महाराज,राजर्षी शाहू महाराज,कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी,भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे (राज्यकाळ १८९४-१९००) आणि पहिले छत्रपती(१९००-१९२२) होते.
🔱🔱🔱
मराठा साम्राज्य: कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ: इ.स.१८८४-१९२२
अधिकारारोहण: २एप्रिल१८९४
राज्यव्याप्ती कोल्हापूर
राजधानी: कोल्हापूर
पूर्ण नाव: छत्रपती शाहू महाराज भोसले
जन्म: २६ जून१८७४(लक्ष्मी-विलास राजवाडा,कसबा बावडा,कोल्हापूर)
मृत्यू: ६ मे१९२२(मुंबई)
पूर्वाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज (चौथेशिवाजी)
उत्तराधिकारी छत्रपती राजाराम भोसले
वडील: आबासाहेब घाटगे.
आई: राधाबाई
पत्नी: महाराणी लक्ष्मीबाई भोसले
राजघराणे: भोसले
राजब्रीदवाक्य: जय भवानी.
राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात.शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली.१८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले.जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले,सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली,तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात.
👇 पुरस्कार 👇
🔱शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात.अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे:
🔱राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक आणि सामाजिक कार्यकत्या प्रा. पुष्पा भावे यांना (२६ जून २०१८)
🔱कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त ६ जिल्हा परिषद सदस्य,३ पंचायत समिती सदस्य व १५ कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला (२६ जून २०१८)
🔱राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार डॉ.रघुनाथ माशेलकर यांना (२६ जून २०१७)
🔱शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात.
🙏कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे ‘राजर्षी पुरस्कार’ रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरूपात दिला जातो.
शाहू महाराजांबद्दल व्यक्त केलेली मते:
“शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते:बाबासाहेब आंबेडकर.
badgujar.in टीम
Leave a Reply