समाज बांधव श्री यशवंत काशिनाथ बडगुजर यांना आर्थिक मदतीचे आव्हान

पिंपळकोठा येथील आपले समाज बांधव श्री यशवंत काशिनाथ बडगुजर हे बरेच दिवसापासून आजारी असून त्यांनी डॉक्टर उल्हास पाटील यांच्याकडे उपचार घेत असून त्यांच्या उपचारात त्यांना कॅन्सर व टीबी झाल्याचे निदर्शनात आले त्यांच्या छातीत पाणी झाल्यामुळे त्यांच्या छातीतील पाणी काढून त्यांच्यावर सरकारी स्कीम अंतर्गत पाच लाखापर्यंत उपचार करण्यात आले पुढील उपचार करण्यासाठी गव्हर्मेंट ची सरकारी स्कीमची मर्यादा संपली असून त्यांच्याजवळ पुढील उपचारासाठी लागणारा पैसा नाही त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक व हलाखीची आहे त्यांच्या घरात कमवणारी कोणी नसून त्यांच्यावर दोन लहान मुलं व पत्नी अवलंबून आहे मोठा मुलगा इयत्ता नववीत शिकत असून लहान सातवी शिकत आहे परंतु मोठ्या मुलाने आपल्या वडिलांचे उपचाराकरिता किराणा दुकानावर मजुरी करीत आहे आजच्या तारखेला त्यांच्यावर औषध उपचारासाठी पैशांची फार अडचण आहे आतापर्यंत नातेवाईकाकडून केलेल्या मदतीवर त्यांचे औषध उपचार चालू असून
पुढील उपचारासाठी सदर समाज बांधवांनी आपापल्या परीने काही मदत करता येत असेल तर करावी असे आव्हान आपणास करण्यात येत आहे Central Bank Of India
Bank A/c : 3908787381,
IFSC : CBIN0282301,
Branch : P.O. Bk. Tal. Erandol, Dist. Jalgoan.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*