📖शैक्षणिक बातमी📖
धुळेः.येथील शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे,मुख्याध्यापक संघ,धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ तथा जिल्हा मुख्याध्यापक संघ धुळे सेंट अँनाज इंग्लिश मीडियम स्कूल गुरुद्वारामागे,धुळे येथे दि.17 व 18 फेब्रुवारी 2023 रोजी २ दिवसीय “विज्ञान प्रदर्शन” आयोजित करणेत आले होते.
सदर कार्यक्रमास धुळे जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री मोहनजी देसले साहेब विविध शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी,प्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय “तंत्रज्ञान आणि खेळणी”असा होता सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन मुख्य विषयाला अनुसरून दिलेला उपविषय”पर्यावरणास अनुकूल सामग्री व वर्तमान उपक्रमासह ऐतिहासिक विकास”,याला अनुसरून संरक्षण के साथ संवर्धनःबहुपयोगी छाता या छत हे मॉडेल बनवले होते सदरहू उपकरण बनवण्यामागे समाजातील कष्टकरी,गोरगरीब जसे रस्त्याच्या कडेला भाजीपाला,फळ,पाणीपुरी,मासे,लाह्या फुटाणे,चहा विकणारे,दुचाकी तीन चाकी सायकल स्वार तसेच लोट गाडी वर विक्री करणारे फेरीवाले,भंगारवाले,कांदे-लसूण,कटलरी विकणाऱ्या व्यक्तींना ऊन-पाऊस पासून संरक्षण सोबत,घरापासून दिवसभर बाहेर असलेल्या या व्यक्तींना लाईट,फॅन,स्पीकर, मोबाईल इत्यादी गोष्टी चार्जिंग करण्यासाठी विद्युत ऊर्जेची गरज असते, दिवसभर त्यांनी घेतलेली बॅटरी ऐनवेळेस चार्ज करणे कुठेही शक्य नसते तसेच वाढत्या वीज बिलावर उपाय म्हणून हे उपकरण बनवले आहे सूर्यापासून मिळणारी फुकटची ऊर्जा छत्रीच्या वर लावलेल्या सोलर प्लेट-ज्या खेळण्यामध्ये वापरले जातात, त्याचा वापर केला आहे दिवसभर सोलर प्लेटच्या साह्याने बॅटरी चार्ज होत राहते व संध्याकाळी आवश्यक असलेला प्रकाश, उन्हाळ्यामध्ये फॅन,स्पीकर, मोबाईल फोन पे/ गुगल पे, इलेक्ट्रॉनिक वजन काटा चार्जिंग, शेतकऱ्यांना फवारणीसाठी लागणारे स्प्रे पंप चार्जिंग होईल अशी सोय छत्रीच्या खाली आतून केली आहे .तसेच जंगल ,सहल,अनोळखी ठिकाणी मोबाईल चार्ज ‘सोलर फोल्डिंग छत’ च्या साह्याने करता येते.
उपकरणाचे↕️फायदे:
हे उपकरण पर्यावरण पूरक, पारंपरिक ऊर्जेचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन,पैशाची बचत करणारे व वाढत्या वीज बिलावर उपाय,अल्पखर्चिक सहज जोडता येण्याजोगे,प्रदूषण विरहित,समाज उपयोगी उपकरण व बहुउपयोगी उपकरण आहे.सदर उपकरणाचा समावेश “४३ वे धुळे जिल्हास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन २०२२-२३ मध्ये करण्यात आला होता.
” धुळे जिल्हा उच्च प्राथमिक गटातून, श्रीमती सिताबाई शंकर माळी कन्या हायस्कूल देवपूर धुळे, इ. ८ वीचे कु.अर्चना कैलास कोळी,चि.भाग्येश लतीश पाठक,कु.जान्हवी प्रभाकर सोनवणे,यांचेसाठीचे
उपकरणः “संरक्षण के साथ संवर्धनःबहुउपयोगी छाता या छत” हे उपकरण निर्माता व मार्गदर्शक: श्री.किरणचंद्र चंद्रकांत साळुंखे[के.सी. साळुंखेसर],M,Sc.BEd] विज्ञान शिक्षक,एस्.एस्.माळी कन्या हायस्कूलधुळे, अध्यक्ष,धुळे शहर विज्ञान-गणित अध्यापक संघ,धुळे.* यांचे उपकरणास प्रथम क्रमांक मिळालेबद्दल धुळे येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष,मा.बापूसाहेब शिवमूर्ती सदाशिवराव खलाणे,सचिव श्री.उदय हिंमतराव महाजन, मुख्याध्यापिका,एस्.एस्.माळी कन्या हायस्कूल,श्रीमती जे.एम्.महानुभाव,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,व विद्यार्थ्यातर्फें सत्कारासह अभिनंदन करण्यात आले.
तसेच धुळे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीवर्ग आणि धुळे व परिसरातील,समाजात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,शिक्षण समिती,बडगुजर_इन टीम,बडगुजर प्रॉउड फॉंऊडेन्शन,क्षत्रिय बडगुजर समाज शैक्षणिक संस्था (बडगुजर बोर्डींग)धुळे व समस्त बडगुजर समाजातर्फे श्री.किरणचंद्र साळुंखेसर यांचे अभिनंदन🌹
🌹🪷🌹🪷🌹🪷🌹
Congratulations Shri.Salunke Sir for First in Science Exhibition Keep it up💐👌