सौ.सारिकाताई महेंद्र पवार(बडगुजर), सामाजिक कार्यकत्या पूर्णा नगर यांच्या तर्फे संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभ संपन्न – सौ. दिपाली कोतवाल, पुणे

🔹हळदी-कुंकू🔹

सौ.सारिकाताई महेंद्र पवार (बडगुजर), शहराध्यक्ष ओ.बी.सी. महिला राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर, अध्यक्ष एकता महिला प्रतिष्ठान व सामाजिक कार्यकत्या पूर्णा नगर यांच्या तर्फे संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ हा शनिवार दिनांक २८.०१.२०२३ रोजी, श्री स्वामी समर्थ कॉलनी नं२, स्पाईन रोड शरद नगर, चिखली पुणे येथे आयोजित केला होता. यावेळी हळदी-कुंकुचा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला. सौ. सारिका ताई पवार ( बडगुजर ) यांनी प्रास्ताविक भाषण केले. विविध प्रकारच्या योजना बद्दल माहिती दिली आणि सगळ्या मैत्रिणींना प्रोत्साहित केले त्यानंतर वाण देऊन हळदी-कुंकुचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रम हा www.badgujar.in कडून live करण्यात आला होता, त्यासाठी कु. रुचिता राऊत यांनीही बडगुजर. इन लाईव्ह करण्यासाठी मदत केली.
त्याचप्रमाणे कार्यक्रमास उपस्थित सर्व महिला भगिनी व समाज बघिनी यांचेही मनापासून आभार मानण्यात आले.

सौ.सारिकाताई महेंद्र पवार (बडगुजर) – 91308 53907

बडगुजर. इन व प्राऊड ग्रुप यांच्या संयुक्त विध्यमानाने आपल्या साठी खाली दिलेल्या लिंकवर 👇आपण पाहु शकतात

लाईव्ह प्रक्षेपण सौजन्य : बडगुजर. इन टिम
www.badgujar.in
एक समाज एक व्यासपीठ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*