पिंपरी/पुणे : बिहारप्रमाणे महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांची स्वतंत्र जनगणना करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शहराच्या ओबीसी महिला सेलच्या अध्यक्षा सौ. सारिका पवार यांनी केली याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांना निवेदन दिले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा मंजिरी पाडो, पंढरीनाथ बनकर ओबीसी सेलचे शहराध्यक्ष खराडे, विजय लोखंडे, सातव, शिवराम जांभूळकर, वृषाली वाडकर, सागर दरवडे, प्रदीप हमे, रवी लडकत, पूनम वाघ, संगीता माळी उपस्थित होते.
जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र, इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी.
देशात २०२१ च्या नियमित जनगनणेचे काम अद्याप सुरू व्हायचे आहे. त्यातही जातीनिहाय गणना करावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे सौ. सारिका पवार यांनी केली आहे.
Very good!