यावल, ह. मु. जळगाव येथील श्री.रामदास बंडू बडगुजर यांचे जेष्ठ पुत्र व डॉ.नितीन रामदास बडगुजर यांचे मोठे बंधू , प्रा. सी. डी. साळुंखे सर यांचे भाचे श्री.संजय रामदास बडगुजर स्वर साधना संगीत क्लासेस चे सर्वेसर्वा. यांची आज आपण जीवनपट बद्दल माहिती जाणुन घेणार आहोत. श्री. संजय बडगुजर यांचे वयाच्या दुसऱ्या वर्षी आजारी असताना त्यांना दृष्टी ही गमवावी लागली व त्यावर मात करत आपले उद्दिष्ट साध्य केले. त्यांचे बालपण व शिक्षण हे जळगांव येथे झाले. एस. एस. सी. हे सागर हायस्कूल जळगांव, महाविद्यालय शिक्षण मु. जे. महाविद्यालयात जळगाव येथे झाले. एम. ए. हे मराठी या विषयातून झाले. त्यांनी पुढे विशारद, संगीत भूषण ही शिक्षण पूर्ण केले. नंतर ते संगीत शिक्षक म्हणून नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईड जिल्हा शाखा जळगाव येथे सन१९९२ ते ९४, भाऊसाहेब काशिनाथ लाठी विद्यालय मंदिर जळगांव येथे सन १९९६ ते २००१, गोदावरी संगीत महाविद्यालय जळगाव २००१ ते २०१२ पर्यत संगीत शिक्षक होते व प्रिन्सिपल या पदावर असताना तिथून स्वतः (इच्छुक) सेवानिवृत्ती घेतली, आणि सध्या संगीत विद्यालयाचे माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे.
श्री. संजय बडगुजर यांना विविध सन्मान,सन्मान चिन्ह, व पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेले आहेत.
पुरस्कार पुढील प्रमाणे :-
१) महिला, बाल व अपंग विकास विभागीय समाज कल्याण कार्यालय पुणे महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे एस. एस. सी. परीक्षेत विशेष गुण संपादन केल्याबद्दल पुरस्कार दिला होता . २) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ युवक काँग्रेस, वंदे मातरम फोरम, तसेच एन. एस. यू. आय. जळगाव जिल्हा व अरुणोदय युथ फाऊंडेशन ऑफ इंडिया यांच्याकडून संगीत क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल अनुक्रमे सन १९९५, ९६, ९७, ९८, १९९९ वर्षासाठी “यशवंत गुणगौरव” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ३) नॅशनल फेडरेशन फॉर दि ब्लाइंड महाराष्ट्र यांच्याकडून ‘तबलावादक” स्पर्धेत विशेष कामगिरी बद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. ४) एन.एस. यु. आय. जळगाव आणि अरुणोदय युथ फाऊंडेशन ऑफ इंडिया आयोजित “रंगोली” ९५ च्या राज्यस्तरीय गौरव गायन स्पर्धेत ‘धनाजी नाना’ अवार्ड ददेऊन गौरविण्यात आले. ५) नटराज कला मंडळ आयोजित भावगीत – भक्तीगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ६) मुळर्जी जैठा महाविद्यालय जळगाव आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमात गीत गायन स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय क्रमांक चे पारितोषिक व उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. ७)जळगाव जिल्हा साहित्य व सांस्कृतिक मंच जळगाव आयोजित जिल्हास्तरीय कवी संमेलनात प्रथम क्रमांक व काव्य चेतना पुरस्कार प्राप्त. ८) आदर्श विद्यार्थी १९९० जळगाव वतीने सत्कार . ९) परीक्षक जिल्हास्तरीय ८वा युवा महोत्सव चोपडा येथे तबला परीक्षक म्हणून काम केले (महाराष्ट्र शासन क्रीडा व युवा संचालन पुणे आयोजित) त्यांनी लेखन केलेले संग्रह –
१) निरोप एवढा सांग पक्षा – काव्यसंग्रह
२) दुःखाजली – कादंबरी
३) निलीमाचा चष्मा – नाटक
४) हुंडा हुंडा हुंडा – कथा
५) रक्षण – कथा
६) आधी राम – कथा
७) आणिक एक दुःख – कथा
८) उमलती कळी – कथा
९) सखी प्रकरण – दीर्घकथा
१०) अंधत्व निवारण समाजाचे योगदान – लेख
११) साने गुरुजींचे जीवन गाथा – लेख
१२) आई – लेख
१३) अंधा साठी सरकारने काय केले – लेख १४) प्रज्ञाशील पुरुष डॉक्टर आंबेडकर – लेख १५) एकविसावे शतक आणि अंध – लेख १६) प्रतिबिंब बेल हस्तलिखित – कार्यकारी संपादक
तसेच दैनिक लोकमत, देशदूत, जनशक्ती, तरुण भारत, गावकरी, सकाळ, वृत्तपत्रे तसेच साप्ताहिक बडगुजर उवाच, प्रेरणा, मासिके त्याचप्रमाणे आकाशवाणी केंद्र जळगांव येथे वेळोवेळी लेखन व भाषणे त्यांनी केलेली आहेत
त्याची आता मल्हार परिवार संचलीत Hooby Dooby Do [ हुबी डुबी डू ]यांचेकडून मुलाखत घेणेत आली. त्यांत श्री.संजय बडगुजर यांचे स्वप्न,आवड-निवड, आचार-विचार,व नव संगीत शौकिनांना दिलेला संदेश ऐकण्यासारखा आहे…चला तर मग् आपला जास्त वेळ न घेता श्री.संजय बडगुजर यांची आगळीवेगळी मुलाखत ऐकू या! 👇
श्री. संजय रामदास बडगुजर :- 9422193192
Leave a Reply