पुणे येथील युवा उद्योजक श्री. शैलेश बडगुजर हे स्टार्टअप इकोसिस्टम एनेबलर अवार्ड’ ने सन्मानित – श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, पुणे

एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटमध्ये एसएमएक्स एंटरप्रेन्योरशिप समिट आणि अवॉर्ड्स 2022 मध्ये पुणे येथील युवा उद्योजक श्री. शैलेश बडगुजर यांना ‘#स्टार्टअपइकोसिस्टमएनेबलर_अवार्ड’ ने पुरस्कृत केले.

श्री. शैलेश बडगुजर, काजवा – संस्थापक आणि सर्जनशील अभियंता आहेत. ते पुणे येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. विष्णू महादू बडगुजर यांचे चिरंजीव आहेत. त्यांचा काजवा या नावाने लाकडी खेळणे व क्राफ्ट बनवण्याचा व्यवसाय आहे. आतापर्यंत विविध एक्जीबिशन्स मध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे तसेच पुणे येथे प्रशस्त दालन सुद्धा आहे.

काजव्याच्या प्रवासातील हा खास मैलाचा दगड आहे. तुमच्या आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार, असे मनोगत श्री. शैलेश बडगुजर यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केले. अक्षय सरोदे सरांचे या अप्रतिम शिखर व्यासपीठासाठी आम्हाला जोडल्याबद्दल विशेष धन्यवाद सुध्दा मानले.

श्री. शैलेश बडगुजर यांना स्टार्टअप इकोसिस्टम एनेबलर अवार्ड’ मिळाल्याबद्दल त्यांचे बडगुजर.इन टिम कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*