कु. श्रावणी महेंद्र बडगुजर यांचा कुस्तीच्या स्पर्धा प्रथम क्रमांक मिळवत विजय संपादन – श्री. रोहित बडगुजर, धरणगांव

पनवेल तालुका कुस्तीगीर संस्था व रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ संलग्न यांच्या सौजन्याने कुस्तीच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धेत कु. श्रावणी महेंद्र बडगुजर यांनी प्रथम क्रमांक मिळवत विजय संपादन केले. यावेळी अध्यक्ष पनवेल तालुका कुस्तीगीर संस्था श्री. बळीराम पाटील, संस्थापक क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य श्री. नामदेवशेठ फडके आयोजक, रा.-जि. प. सदस्य श्री. विलास फडके आयोजक उपस्थित होते. या चुरशीच्या कुस्ती स्पर्धेत कु. श्रावणी महेंद्र बडगुजर पिंपरखेड ता. भडगाव ह. मु. नावडेगाव ता,पनवेल जि. रायगड श्री. महेंद्र गोकुळ बडगुजर यांची कन्या आहे. कु. श्रावणी बडगुजर यांच्या विजयाबद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*