महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा शाखा धुळे अंतर्गत पंचायत समिती धुळे येथील तालुका कार्यकारणी निवड – फागणे धुळे येथील श्री. मनोहर बन्सीलाल बडगुजर यांची उपाध्यक्ष पदी निवड

अभिनंदन!💐 अभिनंदन 💐
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा शाखा धुळे अंतर्गत पंचायत समिती धुळे येथील तालुका कार्यकारणी निवड करण्यासाठी आज दिनांक २4.११.२०२२ रोजी पंचायत समिती सभागृहात सर्व कर्मचाऱ्यांची जाहीर सभा घेण्यात आली.

सदर सभेसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन चे राज्यध्यक्ष माननीय बलराजजी मगर साहेब , राज्य उपाध्यक्ष मा, श्री मनोहरजी बडगुजर युनियनचे जिल्हाध्यक्ष माननीय दिनेशजी महाले, कार्याध्यक्ष किशोरजी पगारे, कोषाध्यक्ष पोपटरावजी सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस दिपकजी महाले, उपाध्यक्ष महेंद्र सामुद्रे, वडनेरे नाना प्रशासन अधिकारी, सूर्यवंशी नाना लेखाधिकारी उपस्थित होते. सभेचे प्रस्ताविक श्री महेंद्र सामुद्रे, श्री पोपटराव सुर्यवंशी यांनी केले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी संघटनेचे महत्व सांगितले.

त्यानंतर अत्यंत खेळीमेळीच्या वातावणात कार्यकारणीची निवड करण्यात आली 1, तालुका अध्यक्ष- श्री. सचिन माळी 2, कार्याध्यक्ष- अतुल पिंजारी 3, कोषाध्यक्ष- श्रीमती वर्षा जोशी 4, सचिव- सुरेंद्र शिंपी 5, सहसचिव- श्रीमती सुनंदा पाटील 6, उपाध्यक्ष विकास सैत्वाल, राहुल भामरे, सतिष पाटील, संतोष बागुल, पद्माकर बागुल, वासाईकर नाना, वैशाली पाटील 7 , जेष्ठ सल्लागार श्री, सुरेशजी मांडे, सूर्यवंशी नाना यांची एकमताने निवड करण्यात आली
नवनिर्वाचित कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांचा राज्यध्यक्ष मा.बलराजजी मगर जि.प. कर्मचारी युनियन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. पोपटराव सुर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले. व सभा संपल्याचे जाहिर केले. 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹

श्री. मनोहर बन्सीलाल बडगुजर यांची महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा शाखा धुळे अंतर्गत पंचायत समिती धुळे येथील तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बडगुजर. इन टिमकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*