सौ. क्रांतीदेवी सुनील महतो रा.विशपुरसों जि. समस्तीपूर बिहार राज्य येथील रहिवासी असून त्या आपल्या तीन मुलींसोबत सुरतवरून बिहारकडे जायला निघाली होती. महिला ह्या आठ महिन्यांची गर्भवती होती. धावत्या रेल्वे प्रवासी महिलेला प्रसूती वेदना सुरु होवून रेल्वेच्या डब्यातच महिलेची प्रसूती झाली. यावेळी अमळनेर रेल्वे पोलिसांसह महिला प्रवाशांनी माणुसकीचे दर्शन घडवत सुपरफास्ट रेल्वे ३१ मिनिटे अमळनेर येथे थांबवून तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. दरम्यान माहिती मिळताच आरपीएफचे कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परतेने धाव घेत रेल्वे डॉक्टर व रुग्णवाहिकेला माहिती दिली. यावेळी त्या रेल्वे डब्यात असलेल्या महिलांना आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी प्रसूतीसाठी आवाहन केले. त्यानुसार उपस्थित महिलांनी सदर महिला प्रवाशाची प्रसूती केली.यावेळी रेल्वेच्या डॉक्टरांच्या उपस्थितीत महिला आणि बाळावर प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल अमळनेर येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले. नवजात बाळ आणि आईची प्रकृती सामान्य आहे. याबाबत सदर महिलेच्या पतीशी संपर्क साधून माहिती देण्यात आली आहे. एएसआय जयपाल सिंग, सीटी दिनेश मांडळकर, डॉ. किरण बडगुजर यांच्या टीमच्या तत्परतेने महिला आणि तिचे बाळ सुखरूप आहे. त्यांच्या या स्तुत्य कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
डाॅ. किरण बडगुजर, रेल्वे पोलीस, एएसआई जयपाल सिंह, मांडळकर, रेल्वे डाॅक्टर व स्टाफ तसेच डब्बा प्रवासी महिला व इतर अनोळखी लोकांनी रेल्वे चालक, अमळनेरचे स्टेशन मास्टर या सगळ्यांना माणुसकीची किंमत समजुन एकमेकास साथ सहकार देवुन जे सत्त्कर्म केले ते खरोखरच प्रशंसनीय आहे. सर्वांना खुप खुप अभिनंदन. यामुळे भारतीय संस्कृति चा मान वाला. ही घटना खुप प्रेरणा देणारी आहे. तुम्हा सर्वांना याचा मोबदला परमेश्वर कोणत्याही रुपाने व्याजासहित नक्की देईल. हरि ॐ ☝☝👌🏼👌🏼👍🙏🙏🌹 — प्रदीप बुधाशेठ बडगुजर अहमदाबाद मो. 9879430909