धुळेः येथे दि.४/११/२०२२ ते ६/११/२०२२ दरम्यान “धुळे जिल्हा क्रीडा संकुल आणि खेलो इंडिया प्रशिक्षण शिबीर” यांचे संयुक्त विद्यमाने “धुळे चॕम्पियन्स् फुटबॉल लीग” चे सामने आयोजित करणेत आले होते.सदर टूर्नामेंटस् मधे एकूण ११ टीम्स् ने सहभाग नोंदविला,विशेष म्हणजे मुंबईहून “मिलान” टीम ने सहभाग नोंदविला पण ते सेमीफॉयनलमधे कनोसा कॉन्व्हेंट धुळे टीमकडून पराभूत झाले,१२टीम्स् मधे धुळे (८)+साक्री(२)+मुंबई(१) चा समावेश होता.
आज झालेल्या सेमि फॉयनलच्या दोन व फॉयनलची मॕच अतिशय चुरशीच्या झाल्यात.फॉयनल मॕच,धुळे जिल्हा संकुलची चॕम्पियन्स व कनोसा काॕन्व्हेंट या दोन टीम्स् मधे झाली.दोन्ही टीम्स् ची खेळी अत्यंत नेत्रदिपक झाली आणि सामन्या दरम्यान गोल न झालेने बरोबरीत होत शेवटी पेनल्टी स्ट्रोक व्दारे निर्णय झाला प्रत्येक टीमकडून ५-५ पेनल्टी स्ट्रोक अडविलेनंतर ६ व्या पेनल्टी स्टोकवर कनोसा कॉन्व्हेंट टीमने गोल करुन विजय संपादन केला.
सदर टूर्नामेंटस मधे रचित प्रशांत बडगुजर याने फॉरवर्डला नेत्रदीपक खेळ करत सर्वात जास्त (७)गोल करत धुळे चॕम्पियन्स लीगचा बेस्ट प्लेअर आॕफ दि टूर्नामेंटस्ची ट्रॉफी पटकावली.
रचित हा धुळे हरिओम कॉलनीचे रहिवासी व मा.ध.पालेशा वाणिज्य महविद्यालयाचे प्रा.प्रशांत हरि बडगुजर व सौ.संयोगिता प्रशांत बडगुजर यांचा मुलगा,शासकीय डी.एड महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक श्री.देवकृष्ण हरि कोतवाल व सौ.रंजना कोतवाल यांचा पुतण्या तथा धुळेस्थित प्रा.सी.डी.साळुंखे सर व सौ.संगीता साळुंखे यांचा नातु आहे.
यापूर्वीही रचितने धुळे येथे जिल्हा पातळी अंडर फोर्टीन, स्टेट लेव्हल विजेता टीमचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून मान मिळविलेला आहे,तसेंच सप्टेंबर महिन्यांत यवतमाळ नॕशनल लेव्हलच्या अंडर फोर्टीन फुटबॉल मॕचेसचा खेळाडू म्हणून सहभाग नोंदविला होता,दुर्दैव्याने पावसामुळे फक्त जळगाव, धुळे,अकोला,नागपूर च्या टीम सोडून इतर राज्याच्या टीम दाखल होऊ न शकलेने रद्द झाल्यांत.
रचितच्या नेत्रदिपक यशाने कोतवाल व साळुंखे परिवारात आनंदाचे वातवरण असुन,रचितवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रचित बडगुजर,आईवडील, काकाकाकू,आजीआजोबाचे बडगुजर.इन, बडगुजर्स प्रॉउड मंच, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती व समस्त बडगुजर समाज यांचेकडून हार्दिक अभिनंदन व रचित यांस खुपखूप शुभेच्छा
Leave a Reply