कुऱ्हे (पानाचे) भुसावळ येथील महात्मा गांधी छात्रालय म्हणजेच
ग्रामीण भागातील गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांसाठी वरदानच ठरले
आहे. गेल्या साठ वर्षात या वस्तीगृहात शिकलेल्या शेकडो गरीब
गरजू मुलांचे जीवन या वस्तीगृहने घडवले आहे. येथील अनेक
माजी विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
शिक्षणामुळेच त्यांच्या जीवनात हे परिवर्तन झाले आहे. या
छात्रालयाचे संस्थापक स्वर्गीय गोविंद पाव्हना बडगुजर व
त्यानंतर त्यांचे सुपुत्र श्री. समाधान भाऊ बडगुजर यांच्या या
ऐतिहासिक कार्यात मोलाचा वाटा आहे. त्यांचे उपकार आम्ही
कधीही फेडू शकणार नाही अशा भावना माजी विद्यार्थ्यांनी
कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केल्या. छात्रालयाचे निवृत्त अधीक्षक
श्री. समाधान भाऊ बडगुजर यांच्या सत्कारा निमित्त कृतज्ञता
सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. समाधान
भाऊ बडगुजर यांचा मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात.
आला दिनांक 30 ऑक्टोबर २०२२ रोजी बोदवड येथील अग्रसेन
भावनात हा समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी
निवृत्त कक्ष अधिकारी श्री. सुखदेव बोदडे हे होते, तर प्रमुख
पाहुणे म्हणून निवृत्त प्राचार्य डॉ. निनाजी सुरंसे (धरणगाव),
पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. महादेव इंगळे,
मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी श्री. रामदास सखाराम सूर्यवंशी,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. रतन बोदडे,
बोदवड चे गटशिक्षणाधिकारी श्री. भास्कर लहासे, संतोष
बडगुजर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे छात्रालयातून शिकून उच्च
पदावर पोहोचलेले माजी विद्यार्थीच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात सर्व बॅचेसचे 175
माजी विद्यार्थी उपस्थित होते. 1962 च्या बॅचचे विद्यार्थी असलेले
श्री. राजाराम तुकाराम इंगळे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित
होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे क्रियाशील
कार्यकर्ते श्री. गोविंद पाव्हना बडगुजर यांनी 1960 साली
संस्थेच्या सहकार्याने हे छात्रालय सुरू केले होते. या वस्तीगृहाची
पायाभरणी होत असताना ज्यांनी खड्डे खोदले श्रमदान केले असे
60-70 वयाचे माजी विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते. सर्व
बॅचेसच्या माजी विद्यार्थ्यांचा हा मेळावा असल्याने 60 ते 70
वयोगटातील ज्येष्ठ सुद्धा माजी विद्यार्थी म्हणून उपस्थित होते.
तब्बल सहा तास चाललेला या कृतज्ञता सोहळ्यात राज्याच्या
विविध जिल्ह्यातून व जळगाव जिल्हाभरातून आलेले डॉक्टर,
वकील, इंजिनियर, शिक्षक, प्राध्यापक, शासकीय सेवेतील
कर्मचारी व अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक अशा विविध
क्षेत्रात कार्यरत असणारे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. श्री.
गोविंद बाबा बडगुजर यांनी खूप मोठ्या संघर्षातून हे वस्तीगृह
नावावर रूपाला आणले. अतिशय कठीण परिस्थितीत
वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शिकवून मोठे केले. अशा अनेक जुन्या
आठवणींना यावेळी माजी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. आपल्या
जडणघडणीत समाधान भाऊ बडगुजर यांचे किती मोठे योगदान
आहे हे सुद्धा सांगितले. बोलताना अनेकांच्या भावना यावेळी
दाटून आल्या. तब्बल सहा तास चाललेला हा कृतज्ञता सोहळा
सर्व माजी विद्यार्थ्यांच्या आपल्या भूतकाळात घेऊन गेला
व्यासपीठावरील मान्यवरांसह माजी विद्यार्थी श्री. सुधाकर
बडगुजर, श्री. अशोक पात्रे, श्री. आरडी कोळी, श्री. अर्जुन पारथे, श्री. शिवदास कळसकर, प्रा. श्री. मंगेश कांबळे, श्री. दीपक इंगळे, श्री. गंगाधर देशमुख, श्री.भास्कर बडगुजर, श्री. दिलीप जाधव, श्री कृष्ण पाटील, श्री.संतोष बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक श्री रतनसाळुंखे यांनी तर मानपत्र लेखन व सूत्रसंचालन श्री.आनंद
सपकाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी श्री.आनंद
निंबाळकर, श्री.शिवदास कळसकर, श्री. कृष्ण पाटील, श्री.
मुकुंद वांगेकर, श्री. सुधाकर बडगुजर, डॉक्टर यशपाल बडगुजर,
श्री.मधुकर सपकाळे, श्री. अर्जुन सपकाळे, श्री. दीपक इंगळे, श्री.
राजू जाधव, श्री. रामलाल बडगुजर यांनी सहकार्य केले. श्री. समाधान भाऊ बडगुजर यांच्या या ऐतिहासिक कार्याला सलाम व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
Leave a Reply