कु. गायत्री रविंद्र बडगुजर हिचे MPSC स्पर्धा परिक्षेत नेत्र दीपक यश – श्री. श्रीराम बडगुजर सर, यावल

||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||

यावल येथील विरारनगरातील रहिवासी श्री रवींद्र तुळशीराम बडगुजर (वेंडर) यांची कन्या गायत्री रविंद्र बडगुजर ही एम. पी. एस. सी. परीक्षा २०२२ च्या महाराष्ट्र राज्याच्या आर.टी.ओ. कार्यालयाच्या अंतर्गत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पदी ओ. बी. सी. महिला प्रवर्गातून १७ क्रमांकाने निवड झाली आहे. जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय फैजपूर येथून बी. ई. मेकॅनिकल इंजिनियर अभियांत्रिकी पदवी ही ऑगस्ट २०१७ मध्ये उत्तीर्ण झालेल्या आहेत. तिचे ह्या नेत्र दीपक यशाबद्दल फैजपूर येथील प्रांत अधिकारी श्री. कैलास कडाळा सो. व यावल तालुक्याचे तहसीलदार श्री. महेश पवार सो. यांनी विशेष अभिनंदन केले,तसेच फैजपूर येथील महाविद्यालय जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, गुरुवर्य व प्राचार्य, तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक स्तरावरून तिचे कौतुक होत आहे तसेच या यशा बद्दल अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा !!🌹🌹

9 Comments

  1. अभिनंदन गायत्री पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 💐💐

  2. मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! 👍👌💐
    व पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा ! 💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published.


*