बडगुजर विद्या प्रसारक मंडळ, जळगांव आयोजित गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न – श्री. राजेंद्र पवार, जळगांव

जळगाव — दि.09.10.2022 रविवार रोजी जळगांव येथे बडगुजर विद्या प्रसारक मंडळाने बडगुजर समाजाचा जिल्हा स्तरीय गुण गौरव सोहळा बडगुजर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. विकास भाऊ बडगुजर यांचे अध्यक्षते खाली आयोजित केलेला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुळगाव चोपडा व सद्या पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्री. अशोक सिताराम पाटील, धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. रमेश दयाराम बडगुजर, भुसावळ व सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले श्री. सुनील भाईदास बडगुजर, अंमळनेर येथील श्री. भालचंद्र बडगुजर, व सौ. मंगलाताई बडगुजर, भुसावळ येथील श्रीमती विमलताई भाईदास बडगुजर,तसेच जळगांव येथील प्रा. श्री. अविनाश योगराज बडगुजर व जळगांव येथील श्री. उमाकांत प्रभाकर बडगुजर व जिल्यातील समाजाचे मान्यवर या कार्यक्रमा साठी उपस्थित होते.


सदर गुण गौरव सोहळ्यात जवळ जवळ 42 विध्यार्थी व विध्यार्थिनी व त्याचे पालकांसह गौरविण्यात आले त्यावेळी समाजातील इतर बंधू व भगिनी मोठया प्रमाणात व विद्या प्रसारक मंडळाची संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित होते. यावेळी विध्यार्थ्यांना प्रा. अविनाश बडगुजर व श्री. उमाकांत बडगुजर तसेच लोहारी ता. पाचोरा येथील श्री नरेंद्र भाऊ बडगुजर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. श्री. अशोक दादा पाटील यांनी अत्यंत भावुक होऊन त्यांनी त्यांच्या परिस्थिती वर कशाप्रकारे मात मिळवीत यश प्राप्त केले याचे कथन केले, त्यावेळी त्यांच्या धर्मपत्नी कै. अरुंधती ताई यांनी कशाप्रकारे संसार केला याचे देखील कथन केले व कै. पराग हे त्यांचे चिरंजीव यांनी त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी केलेल्या कामाचा त्यांनी गौरव केला.यावेळी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव अत्यंत भावुक होऊन त्यांना ऐकत होता. गुण गौरव सोहळ्यात विध्यार्थाना डॉ. श्री. अशोक दादा पाटील यांचे कडून कै. अरुंधती ताई व कै. पराग भाऊ यांचे नावाने स्मृतीचिन्ह व रोख बक्षीस व बडगुजर विद्या प्रसारक मंडळ यांचे कडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडणेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष श्री प्रकाश धुडकु बडगुजर, उपाध्यक्ष श्री सुरेश महाले, (भुसावळ ) उपाध्यक्ष, श्री राजेंद्र पवार (एरोंडोल ) सचिव श्री बिपीन पठार, अधीक्षक, ललित बडगुजर खजिनदार, श्री राजेंद्र पवार ( जळगाव )माजी अध्यक्ष श्री लीलाधर बडगुजर, श्री भिला गुरुजी, श्री प्रकाश नागो बडगुजर, व इतर पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली.
शेवटी बडगुजर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यांनी उपस्थितांचे आभार मानले.

1 Comment

  1. विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित गुण गौरव पुरस्कार सोहळा अत्यंत स्तुत्य उपक्रम सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकारिणीचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*