आपण लहानपणी आपल्या आजी, आजोबा, आई, वडील आपल्याला “चांदोमामा” ची छान कविता सांगत असत ती आजच्या नवीन शब्दांत, शब्दकोशात छोटासा प्रयत्न श्री. अमोल सर यांचे सादरीकरण …
चांदोमामा
एक रात्री झोपलो होतो मी माझ्या खाटेवर
माझी नजर त्याच्यावर आणि त्याची माझ्यावर
मी राहिलो जमिनीवर आणि तो अगदी वर
आकाशात चांदोमामा होता त्याच्या वाटेवर
मी म्हटले चांदोबाला जेवलास का रे बाबा
का मग सर्व चांदण्याचा आहे जेवणावर ताबा
दमला असशील बाबा आता बस इथे खाटेवर
आकाशात चांदोमामा होता त्याच्या वाटेवर
लाडाने म्हणतो मामा तुला आई चा तू भाऊ
कधीतरी आण की माझ्या साठी मस्तपैकी खाऊ
बर्फी पेडा लाडू चकली भेटतील ना वाटेवर ?
आकाशात चांदोमामा होता त्याच्या वाटेवर
रात्री मस्त फिरून सकाळी जाण्याची तुला घाई
तुझी वाट बघण्यात संपूर्ण दिवस निघून जाई
उद्या पुन्हा आकाशात भेटशील ना वेळेवर
आकाशात चांदोमामा होता त्याच्या वाटेवर
लेखक :- श्री. अमोल बडगुजर सर, मोबाईल नंबर :- 89050 77604
छान, सुंदर 👌👌
आभार