पिंप्री खुर्द ता. धरणगांव येथे श्री. देवी भागवत महापुराणाचे आयोजन श्री. मुकुंदा सुकलाल पवार यांच्याकडून करण्यात आले होते. या भागवत महापुराणाच्या निमित्ताने व सांगता समारोह असल्याकारणाने या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता कॅबिनेट मंत्री आदरणीय नामदार श्रीमान गुलाबरावजी पाटील यांनी आवर्जून उपस्थिती दिली. श्री. गुलाब पाटील साहेब यांनी मंदिराच्या बांधकामासाठी ५१००० रुपये ही रोख स्वरूपात देणगी दिली. व त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमच्या पाळधी येथील मंदिरात सकाळ संध्याकाळ आरती होते आणि आरतीच्या निमित्ताने सर्वजण एकत्र जमतात आणि हीच काळाची गरज आहे. मंदिर पूर्ण झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर या ठिकाणीही आपण सकाळ आणि संध्याकाळ आरती व्हायला पाहिजे जेणेकरून समाज बांधव गावातील ग्रामस्थ, समाज बांधव, भगिनी, व परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी या निमित्ताने एकत्र येतील. मी दिलेल्या देणगीतून एक चांगली साऊंड सिस्टिम या ठिकाणी ट्रस्टींनी घ्यावी आणि मंदिरावरती लावावी अशी सूचनाही त्यांनी केली. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती जास्त बघून भाऊंनी सांगितले की ज्या ठिकाणी नारीशक्ती अधिक असते त्या ठिकाणी निश्चितच बदल हा घडतोच. नामदार गुलाबरावजी पाटलांच्या हस्ते आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. बडगुजर समाज बहुउद्देशीय ट्रस्टींच्या वतीने आदरणीय गुलाबरावजी पाटलांचा सत्कार करण्यात आला. पिंपरीतील दानशूर व्यक्ती श्रीमान सतीश बेडूराम बाहेती यांच्या हस्तेही नामदार गुलाबरावजी पाटलांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस संपूर्ण पिंप्री आणि परिसरातील बंधू भगिनी उपस्थित होत्या. महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बडगुजर समाज बहुउद्देशीय ट्रस्ट तसेच संपूर्ण बडगुजर समाजातील बांधव इतर समाजातील ग्रामस्थांनीही अनमोल अशी कामगिरी केली. श्री. योगेश बडगुजर सर व श्री. सुनील बडगुजर सरांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रम यशस्वी घडवून आणला.
Leave a Reply