आपल्या समाजातील जळगाव येथील निर्माता, गीतकार, संगीतकार आणि उत्कृष्ट गायक असे श्री स्वप्निल रामलाल बडगुजर रा. जळगाव यांच्या
“नवरात्री आई है”
या ५ व्या गाण्याचा प्रकाशन सोहळा दि. १/१०/२०२२, शनिवारी, जळगाव येथे जिल्ह्याचे लाडके आमदार श्री राजूमामा भोळे यांच्या हातून नुकतेच संपन्न झाला. हे गाणे श्री मंगलराम प्रोडक्शन या यूट्यूब चैनल वर आपणास सर्वांना बघावयास मिळेल तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी या गाण्याला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्यावे. श्री स्वप्निल बडगुजर हे श्री रामलाल तुकाराम बडगुजर, (ग्रामविकास अधिकारी) आणि कै. मंगला बडगुजर, कढोलीकर ह. मु जळगाव यांचे चिरंजीव आहेत. समाजाच्या सर्व स्तरातून श्री स्वप्निल बडगुजर यांचे कौतुक होत असून त्यांना पुढील वाटचालीस समाजातर्फे खूप खूप शुभेच्छा.
Leave a Reply