चि. रोहित राजू बडगुजर M.S. या उच्च शिक्षणासाठी England (UK) उत्तुंगभरारी – श्री. योगेश बडगुजर सर, पिंप्री

चोपडा येथील समाज बांधव कै. जगन्नाथ सुपडू बडगुजर यांचा नातू व श्री राजू जगन्नाथ बडगुजर(सेवानिवृत्त मुख्याध्यापक) आणि सौ. मंगला राजू बडगुजर (मुख्याध्यापिका) ओ.क. गिंदोडिया विद्यामंदिर धुळे यांचा मुलगा चि. रोहित राजू बडगुजर M.S. या उच्च शिक्षणासाठी Master In Project Management University of Liverpool, England (UK)या ठिकाणी दि.20/09/2022 सोमवार रोजी रवाना होऊन यशस्वी भरारी घेतली आहे. चि.रोहित याने सिंहगड कॉलेज लोणावळा येथून B.E(mechanical) चे शिक्षण विशेष प्राविण्यासह पूर्ण करून संजीव ऑटो, औरंगाबाद येथे Global Sourcing Specialist या पदावर दोन वर्ष यशस्वीरित्या जॉब केला आहे. चि. रोहित याच्या उत्तुंग भरारीमुळे श्री. राजू जगन्नाथ बडगुजर यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण आहे. श्री.राजू बडगुजर यांचा परिवार हा उच्च शिक्षित असून त्याचा लहान मुलगा चि.वैभव हा M.D.(Medicine) चे शिक्षण घेत आहे. त्याचे काका श्री. सुनील जगन्नाथ बडगुजर हे विचखेडे ता.पारोळा येथे जि.प.प्राथ.शिक्षक म्हणून कार्यरत असून काकू प.स.धरणगाव येथे शिक्षण विभागात विषयतज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि लहान काका श्री. विजय जगन्नाथ बडगुजर हे पारोळा येथील व्ही.एम.जैन हायस्कूल येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असून काकू मेहू टेऊ ता.पारोळा येथे जि.प.प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. अशा ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या परिवारात चि. रोहित ने या सर्व कुटुंबाच्या मार्गदर्शनाने आज उत्तुंग भरारी मारली आहे.यासाठी चि.रोहित यास त्याचे मामा श्री.दत्तात्रय गजानन बडगुजर व श्री. प्रमोद गजानन बडगुजर कल्याण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच त्याचे मावसभाऊ श्री.निखिल निर्मलकुमार सूर्यवंशी( संपादक- सकाळ वृत्तपत्र ,धुळे) व श्री.मनोज सुधाकर बडगुजर (शिक्षक)यांचे विशेष सहकार्य लाभले.चि. रोहित च्या या यशाबद्दल त्याची आजी गं.भा. मंडाबाई जगन्नाथ बडगुजर ,आजोबा श्री. मगन सुपडू बडगुजर,सुभाष सुपडू बडगुजर यांचे शुभ आशीर्वाद लाभले तसेच संपूर्ण परिवार आत्या मामा ,मावशी मावसा ,आप्तेष्ट व मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣,समाज मित्र मंडळ चोपडा,गुरुदत्त ग्रुप धुळे,आदिनाथ पार्क धुळे येथील सर्व सदस्य यांच्याकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

श्री राजू जगन्नाथ बडगुजर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) मोबा.नं.9834861708, 8830413456

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*