कु.अनघा पराग पाटीलचे नीट परिक्षेत घवघवीत यश – श्री.संजोग साळुंखे,चोपडा

अभिनंदननीय🌹बातमी
चोपडाः बिडगांवकर ज्येष्ठ समाजसेवक तथा प्रगतीशील शेतकरी, बापूसाहेब विठ्ठल ओंकार पाटील व नाशिकस्थित उद्योजक दादासाहेब सुभाष डिगंबरशेठ बडगुजर यांची नात आणि चोपडा येथील प्रसिध्द स्री रोग तज्ञ डॉ.पराग पाटील व डॉ.सौ.स्मीता पाटील यांची सुकन्या अनघा हिने नुकत्याच जाहिर झालेल्या नीट NTA NEET परिक्षेत ५२४ गुण संपादन करत ९६.२२ पर्सेंटाईल मार्क्स् मिळवून अखिल भारतीय पातळीवर ६६२१९ वा नंबर {All India Rank No 66219} पटकावला. या दैदिप्यमान यशापूर्वी चि.अनघा ने “पंकज ग्लोबल पब्लीक स्कूल,चोपडा” येथून ९१.६० टक्के गुण मिळवत शाळेत तिसरा क्रमांक पटकावला होता. याचे वृत्त सर्वप्रथम वेब पोर्टल टीमतर्फे देण्यात आले होते.
असे म्हणतात की “लक्ष्मी व सरस्वती एका घरात सुखाने कधीही नांदत नाहीत” पण बिडगांवकर पाटील परीवार या म्हणीस अपवाद असल्याचे म्हणावे लागेल, कारण मुळचा शेती व्यवसाय असलेल्या या परीवाराने बडगुजर समाजास १८-२० डॉक्टर्स-इंजिनीअर्स दिलेत व सदर परीवार शैक्षणिक, सामाजिक,वैद्यकीय सेवेत अग्रेसर आहे,एव्हढे असूनही संपूर्ण परीवाराला गर्वाच्या गंधाने स्पर्शही केलेला नाही.
कु.अनघा ही आपले आजोबा डॉ.दिपक{साई डॉ.दिलीप {नाना}, डॉ.पराग व डॉ.स्मीता(आई-वडील) डॉ.काकाकाकूंचा,आदर्श डोळ्यासमोर ठेवत वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्याचा मानस व्यक्त केला आहे कु.अनघाचे दैदिप्यमान यशामुळे पाटील परीवारात आनंदी वातावरण असून कु.अनघाचे सर्वत्र कौतुक व पाटील परीवारावर अभिनंदनाचा वर्षाव आहे. श्री.विठ्ठलबापू व पाटील परीवाराच्या आनंदात मामामावशी परीवार,पूज्य सानेगुरुजी प्रबोधन मंडळ,कार्यकारिणी मंडळ व सदस्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा साळुंखे परिवार सहभागी आहे,सर्वांतर्फे कु.अनघाचे कोडकौतुक आणि पुढील शैक्षणिक कारकिर्दीस शुभेच्छा तथा विठ्ठलबापू व पाटील परीवाराचे मनःपूर्वक अभिनंदन. अ.भा.बडगुजर समाज महासमिती,बडगुजर्स प्रॉऊड फॉऊंडेन्शन,वेब पोर्टल टीम व सामस्त बडगुजर समाजातर्फे कु.अनघाचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वैद्यकीय शैक्षणिक कार्यास भरभरून शुभेच्छा🌹🌹

6 Comments

  1. अनघा चे यश तिच्या असीम मेहनतीचे पारितोषिक आहे. रात्रभर अभ्यास करून पहाटे 3 ते 4 पर्यंत जागरण, सकाळी 10 वाजता तयारी करून पुन्हा अभ्यास साठी सज्ज, यात वर्षांचे सातत्य, विशेष करून आई वडील कामात व्यस्त असून स्वतः पुढाकार घेणे, अभ्यासाचे नियम पाळणे यात तिने कमालीचे मोठेपणा दाखवला. येत्या काळात अनघा समाजातील किर्तीमान doctor होऊन नावारूपाला येईल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.


*