||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
कोरोना संसर्गजन्य साथीच्या काळात ही शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने व निष्ठेने अध्यापन आणि उल्लेखनीय, प्रशंसनिय कार्य ,आरोग्य, जन जागरणाचे भरीव कार्य करणा-या, विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करणा-या उपक्रमशिल, प्रज्ञावंत शिक्षकांना जनगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून दरवर्षी सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे गौरवण्यात येते.या वर्षी देखील आदर्श शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शिक्षकांकडून कोणताही प्रस्ताव न मागविता परिसरातील जनमानसातून, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व सन्मित्र क्रीडा मंडळाच्या निवड समितीने ही निवड केली आहे, हे या पुरस्काराचे खास वैशिष्ट्य आहे. आदर्श पुरस्कार शिक्षक चोपडा ह. मु.शहादा येथील श्री. रविंद्र मोहन बडगुजर – जि. प. शाळा घोडलेपाडा ता. शहादा , यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकांना लवकरच मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कार वितरण समारंभ लवकरच कळविण्यात येईल.
असे सन्मित्र बहुऊद्देशिय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानी कुलकर्णी,उपाध्यक्ष अँड. राजेश कुलकर्णी,सचिव प्रा.संपत कोठारी,ज्ञानेश्वर चौधरी, प्रतिमा माळी, प्रविणा कुलकर्णी, प्रतिभा बोरसे, कल्पेश पटेल, प्रा.आर.टी.पाटील,डॉ.विवेक नगीन पाटील, समीर जैन, रोहन माळी, संचालकातर्फे जाहीर करण्यात आले आहे. श्री. रविंद्र मोहन बडगुजर याचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
हार्दिक अभिनंदन रवींद्र सर पुरस्कार मिळल्या बद्दल
मनःपूर्वक धन्यवाद..! 🙏