गुणगौरवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप – बातमी प्रतिनिधी श्री. विजय बडगुजर, नंदुरबार

गुणगौरवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या
पाठीवर कौतुकाची थाप-चंद्रकांत रघुवंशी

संख्येने लहान असला तरी बडगुजर समाज एकसंघ

नंदुरबार-समाज लहान असो वा मोठा, तो संघटीत राहणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात बडगुजर समाज संख्येने लहान असला तरी संघटीत समाज आहे. दरवर्षी गुणगौरवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवण्याचे काम बडगुजर समाज करीत असते, हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. ते येथील बडगुजर समाज विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
येथील बडगुजर समाज उन्नती मंडळ तसेच बडगुजर समाज महिला मंडळ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२८ ऑगस्ट २०२२ रविवार रोजी लोकमान्य टिळक वाचनालय सभागृह, सराफ बाजार येथे ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ’ पार पडला. यावेळी ७५ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई अध्यक्ष तथा उद्योजक बापू किसन बडगुजर, सचिव डी.डी.मोरडीया, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे उपाध्यक्ष दिलीप राघो बडगुजर, नंदुरबार न.पा.चे नगरसेवक दीपक प्रभाकर दिघे, नथ्थुआण्णा प्रतिष्ठान, बोराडी अध्यक्ष तथा उद्योजक ज्ञानेश्‍वर नथ्थु बडगुजर, आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त, बोराडी सौ.सुनंदाताई विष्णू बडगुजर, सोनशेलू ग्रामपंचायत (ता.शिंदखेडा) सरपंच सौ.प्रियंका धिरज बडगुजर, लोहारी येथील बडगुजर समाज अध्यक्ष नरेंद्र बडगुजर हे उपस्थित होते. यावेळी उद्योजक बापू बडगुजर म्हणाले की, पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारी ज्ञानाची विद्यार्थ्यांना गरज आहे. विद्यार्थ्यांना यश-अपशय पचविता आले पाहीजे. कुठल्याही परीक्षेत अपयश आल्यास खचून न जाता प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनीही इतिहास घडविला आहे. नोकरी मिळाली नाहीतर व्यवसायाकडे वळा. एक चांगला उद्योजक होवून आपण इतरांना रोजगार देवू शकतो. श्रीमती सुनंदाताई बडगुजर म्हणाल्या की, प्रत्येकाच्या जीवनात आई हाच आपला पहिला गुरु असतो. विद्यार्थ्यांमध्ये घरातून संस्कारांची सुरुवात होत असते. यावेळी दिलीप बडगुजर, नरेंद्र बडगुजर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मंडळाचे सल्लागार पंडीत बडगुजर यांनी सन्मानचिन्हासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष विजय बडगुजर यांनी केले. तर आभार सचिव अश्‍विन बडगुजर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष रविंद्र बडगुजर, सहसचिव दिनेश बडगुजर, खजिनदार देविदास बडगुजर, सदस्य भरत कोतवाल, प्रकाश बडगुजर, गणेश बडगुजर, विलास बडगुजर आदींनी परिश्रम घेतले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*