नंदुरबार (प्रतिनिधी) येथील बडगुजर समाजातर्फे दि. २८ ऑगस्ट रोजी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात समाजातील सेवानिवृत्त, पदोन्नती प्राप्त समाजबांधवांचाही सत्कार करण्यात येईल. नंदुरबार येथील बडगुजर समाज उन्नती मंडळ तसेच बडगुजर समाज महिला मंडळ यांच्या विद्यमाने दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नंदुरबार येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी हे असतील. याप्रसंगी बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई चे अध्यक्ष तथा उद्योजक श्री. बापू बडगुजर, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे उपाध्यक्ष श्री. दिलीप बडगुजर, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुनिल नंदवाळकर, नगरसेवक श्री. दिपक दिघे, कै. नथ्थुआण्णा प्रतिष्ठान बोराडीचे अध्यक्ष तथा उद्योजक श्री. ज्ञानेश्वर बडगुजर, आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त श्रीमती सुनंदाबाई
बडगुजर, सोनशेलूच्या सरपंचा सौ. प्रियंका बडगुजर आदी उपस्थित राहतील.कार्यक्रमास समाजबांधवांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन बडगुजर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय बडगुजर, बडगुजर समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुनिता बडगुजर व मंडळाच्या संचालकांनी केले आहे.
Leave a Reply