पुणे येथील “बडगुजर समाज बहूउद्देशीय संस्था, पुणे” तर्फे वार्षिक सर्वसाधारण सभा व स्नेहमेळावा संपन्न

पुणे येथील “बडगुजर समाज बहूउद्देशीय संस्था, पुणे” तर्फे वार्षिक सर्वसाधारण सभा व स्नेहमेळाव्याचे आयोजन रविवार दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी, चैतन्य सभागृह, चिंचवड येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरातील ५०० पेक्षा अधिक समाज बांधवांनी हजेरी लावली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते बडगुजर समाज कुलदैवत चामुंडा मातेच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. अशोक सिताराम बडगुजर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालक, मंडळाचे जेष्ठ सल्लागार तथा मार्गदर्शक श्री. प्रदीपशेठ त्र्यंबक बडगुजर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व स्वरूप सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेचे सचिव श्री. रतिलाल बडगुजर यांनी मांडले. तद्नंतर नवनियुक्त कार्यकारणी मंडळींचा ओळख परिचय समाजबांधवांना करून देण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरात नवीन आलेले समाजबांधवांचा ओळख परिचय घेण्यात आला.

जेष्ठ नागरिक समाजबांधवांचा सत्कार करतांना संस्थेचे पदाधिकारी

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण “कै. प्रकाश रघुनाथ बडगुजर” यांनी सुरू केलेल्या “बडगुजर समाचार” या वृत्तपत्र अंकाचे प्रकाशन सभेचे अध्यक्ष श्री. अशोक सिताराम बडगुजर, मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल गणपत बडगुजर, वृत्तपत्र चे संपादक श्री. राहुल प्रकाश बडगुजर, व्यासपीठावर उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र वसंत बडगुजर, कार्याध्यक्ष श्री. भगवान दत्तात्रय बडगुजर, सचिव श्री. रतिलाल बडगुजर, जेष्ठ सल्लागार श्री. प्रदीप बडगुजर व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

बडगुजर समाचार च्या अंकाचे प्रकाशन करतांना मान्यवर

सदरील कार्यक्रमात मंडळातर्फे पुणे परिसरातील जेष्ठ समाज बांधव ज्यांचे वय ७० पेक्षा जास्त आहे अशा समाजबांधवांचा सत्कार, सेवानिवृत्त झालेले समाजबांधवांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार मागील शैक्षणिक वर्षात ५ वी ते १२ वी यात गुणवंत झालेल्या, खेळात किंवा इतर शाखेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार श्री. अशोक सिताराम बडगुजर यांच्या तर्फे त्यांच्या पत्नी कै. अरुंधति बडगुजर व मुलगा कै. पराग बडगुजर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राजश्री सुदाम बडगुजर यांनी केले.

जेष्ठ नागरिक समाजबांधवांचा सत्कार करतांना मंडळाचे सदस्य

कार्यक्रमाच्या भोजनाचे अन्नदाते व नुकत्याच ६१ वर्षे पुर्ण केलेले संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष “श्री. अनिल गणपत बडगुजर “ सहपरिवार सत्कार मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष श्री. राजेंद्र बडगुजर, कार्याध्यक्ष श्री. भगवान बडगुजर, सचिव श्री. रतिलाल बडगुजर, जेष्ठ सल्लागार श्री. प्रदीप शेठ बडगुजर व कार्यकारणी सदस्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल शेठ यांचा सहपरिवार सत्कार करतांंना

तद्नंतर उपस्थित समाजबांधवांपैकी काही समाजबांधव श्री. अरविंद शुक्ल, बडगुजर समाजाच्या उभरत्या महिला नेतृत्व सौ. सारिकाताई पवार, सौ. राजश्रीताई बडगुजर, श्री. प्रकाश नागो बडगुजर इ. समाजबांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पुणे विभागाचे धडाडीचे व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. गणेश चव्हाण यांचा सत्कार करतांना श्री. अनिलशेठ बडगुजर.

त्यानंतर सभेचे अध्यक्ष श्री. अशोक बडगुजर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना “विद्यार्थी व युवावर्ग मुले हीच समाजाची व देशाची खरी संपत्ती आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले तर समाजाची व सोबतच देशाची प्रगती होईल. मुलांच्या कला-गुणांचे वाव मिळावा त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हे बक्षिस आहे.” असे मत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करत असतांना त्यांना त्यांची पत्नी व मुलाच्या आठवणींनी भावुक झाले होते. नंतर मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल बडगुजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी येणाऱ्या पुढील काळात मंडळाची कार्य नियोजन व समाज संघटन कसे मजबूत करणार आहेत यावर मार्गदर्शन केले.

गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करतांना संस्थेचे सदस्य

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालनाची धुरा संस्थेचे जेष्ठ सल्लागार श्री. प्रदीपशेठ बडगुजर यांनी आपल्या बहारदार शैलीत करीत उपस्थित समाजबांधवांना कार्यक्रमाशी जोडून ठेवले त्यांना सोबत म्हणून सौ. राजश्री ताई बडगुजर व श्री. लोकेश कोतवाल यांनी सुत्रसंचालकांची साथ लाभली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळाचे लोकप्रिय कार्याध्यक्ष श्री. भगवान दत्तात्रय बडगुजर यांनी अनोख्या शैलीत करत सर्व काही ओके ओके करत समाजबांधवांचे लक्ष वेधी आभार मानलेत. त्यानंतर राष्ट्रगीत घेऊन सभेची सांगता करण्यात झाली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व समाज बांधवांनी वरण-बट्टी व वांग्याची भाजी खान्देशी जेवणाचा आस्वाद घेतला.

1 Comment

  1. Nice organization of program and congratulations for encouraging the students for their achievements. Congratulations whole team

Leave a Reply

Your email address will not be published.


*