नंदुरबार येथील कु. निधीचे जिल्हा व राज्यस्तरीय जम्प रोप स्पर्धेत विशेष यश सोबतच राष्ट्रीय पातळीवर निवड – श्री. दिलीप राघो बडगुजर, नंदुरबार

बडगुजर समाज उन्नती मंडळ, नंदुरबार चे अध्यक्ष श्री. विजय संतोष बडगुजर व सौ. मनीषा विजय बडगुजर यांची सुकन्या कुमारी निधी विजय बडगुजर हिने जम्प रोप स्पर्धेत विशेष कामगिरी करत यश संपादन केले.

कु. निधी हिने ही या पूर्वीही राज्यस्तरावर खेळून आलेली आहे. दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी नंदुरबार येथे झालेल्या जम्प रोप स्पर्धेत जिल्हास्तरावर तिने गोल्ड मेडल पटकाविले. तसेच दिनांक 20 व 21 ऑगस्ट 2022 रोजी नंदुरबार येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य स्तरीय जम्प रोप स्पर्धेत तिने सिल्वर मेडल पटकाविले. तसेच भोपाल येथे होणाऱ्या जम्प रोप स्पर्धा साठी राष्ट्रीय स्तरावर तिची निवड झाली आहे.

कु. निधी हे नंदुरबार येथील पी.जी. पब्लिक स्कूल येथील इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे. अतिशय होतकरू व अभ्यासू विद्यार्थिनी आहे तिने या खेळा सोबतच तिला कलाक्षेत्राची सुध्दा आवड आहे. कु. निधीस पुढील भव्यदिव्य वाटचालीस बडगुजर. इन टिम कडून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 🌹🌹

3 Comments

  1. कुमारी निधी विजय बडगुजर हिने जंप रोप स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल व सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छुक सुनील मधुकर बडगुजर करोडपती उल्हासनगर

Leave a Reply

Your email address will not be published.


*