मध्य प्रदेश बऱ्हाणपूर येथे श्री क्षत्रिय सकल पंच बडगुजर समाज यांचा कडुन तिरंगा यात्रा संपन्न – श्री. धर्मेश बडगुजर, सुरत

मध्य प्रदेश श्री क्षत्रिय सकल पंच बडगुजर समाज बऱ्हाणपूर यांच्याकडून दिनांक 14/8/2022 रोजी दुपारी 75 व्या अमृत महोत्सव साजरा करत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, ही यात्रा आपल्या बडगुजर समाजाकडून आयोजन करण्यात आले होते यात ग्राम बहादरपूर समाज चे पंच निर्वाचित श्रीमती रेखाबाई प्रमोद चव्हाण, श्री श्रीनाथजी भवरे, व श्रीमती राजनंदनी चव्हाण यांचा समाजाकडून सन्मान करण्यात आला व श्री क्षत्रिय सकल पंच बडगुजर समाज बऱ्हाणपूर चे अध्यक्ष यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली ही रॅली राजघाट हनुमान मंदिर पासून सुरुवात करून पुढे मार्गक्रमण करत याचा समारोप हा राजघाट हनुमान मंदिर येथे समाप्ती करण्यात आली. तिरंगा यात्रा मध्ये आपल्या बडगुजर समाज बांधव,भगिनी यांनी प्रचंड असा सहभाग दाखवला यात लोणी,पातोंडा, नेफानगर, येथील समाज बांधव ही उपस्थित होते. श्री क्षत्रिय सकल पंच समाज चे अध्यक्ष सुनील कोटवे यानी आभार व धन्यवाद व्यक्त केले. यावेळी श्री हिरालाल बडगुजर पूर्व समाज अध्यक्ष सकल पंच यांच्याही वाढदिवस होता व त्यानिमित्त त्यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला व त्यांना समाजाकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या 🎂🎂🙏🙏

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*