भारत
या भारतात नित्य नवी शांती वसू दे
या भारतात युद्ध नको बुद्ध वसू दे॥धृ॥
नको इथे जातिधर्माची बात
टाकूया जुन्या काळाची कात
करु चला विविधतेने मात
अशी इथे एकतेची बीजे रुजू दे ॥१॥
नको इथे कुणाला क्लेश
नको कुठे अधर्माचा लवलेश
असो सर्वांचा एकच ईश
अशी इथे समतेची बीजे रुजू दे ॥२॥
नको इथे अनीतीचा स्वैराचार
नको तसे कुणामध्ये वैर
असू दे बंधुभावाचा विचार
अशी इथे बंधुतेची बीजे रुजू दे ॥३॥
नको इथे कुणाची मनमानी
नको तशी कुणाची बेईमानी
वसु दे भारतीय अभिमानी
अशी इथे स्वातंत्र्याची वेल फुलू दे ॥४॥
कवी श्री. कैलास भाऊलाल बडगुजर,
३०४/८, अमृत सिद्धी संकुल, टिटवाळा
ता. कल्याण,
जि. ठाणे.
भ्रमणध्वनी: 8888284265
Leave a Reply