अभिनंदन..! अभिनंदन..! अभिनंदन..!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जळगांव येथील डॉ.प्रा.श्री अविनाश योगराज बडगुजर, (प्रा. नूतन मराठा महाविद्याल,जळगांव) व सौ वैशाली अविनाश बडगुजर यांचा मुलगा चि.यज्ञेश याने नुकत्याच झालेल्या १२ वी विज्ञान (CBSE-VII) परिक्षेत ८४.४० टक्के गुण संपादन केलेत. चि.यज्ञेश हा धरणगांव येथील श्री.योगराज शंकर बडगुजर (सेवानिवृत मुख्याध्यापक) व दोंडाईचा येथील श्री.मन्साराम शिंदे (सेवानिवृत्त महावितरण आधिकारी) यांचा नातू आहे. वडील श्री अविनाश सर व आई सौ वैशाली यांच्या इच्छेनुसार व चि.यज्ञेशची ही अभियांत्रिकी शाखेत आपले भविष्य घडविण्याची इच्छा आहे.
चि. यज्ञेश ने इ.१० वी ८६% व जेइइ परीक्षेत ९५.११% गुण संपादन केले असून तो काका प्रा.श्री दिवाकर बडगुजर व मोठा भाऊ प्रणव (B.Tech-NIT, रायपुर, MBA-IIM, लखनौव) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील ध्येय गाठणार आहे.
चि.यजेश व मातापित्याचे सर्वत्र-धरणगांव, दोंडाईचा तसेच जळगाव-धुळे जिल्ह्यातील आप्तेष्ठ, बडगुजर समाज बंधूभगिनी,तथा शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चि. यजेश च्या उज्ज्वल भविष्याकरीता समस्त बडगुजर समाज पंच मंडळ, धरणगांव, अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि बडगुजर.इन वेबसाईट यांच्या तर्फे अभिनंदन … आणि पुढील शैक्षणिक वाटचाल करीता खुप खुप हर्दिक शुभेच्छा…!
एक समाज एक व्यासपीठ…
Congratulations