पुणे येथील श्री. राजेंद्र वसंत बडगुजर, डॉ. श्री. सचिन शंकरराव रघुवंशी आणि श्री. राहुल प्रकाश बडगुजर या तिघे बडगुजर समाजबांधवांची “रोटरी क्लब” वारजे येथे डायरेक्टर पदी निवड झाली आहे. ही पुणे बडगुजर समाजाचा गौरव वाढविणारी बाब आहे. नियुक्त झालेले तिघेही समाज बांधव हे आपला व्यवयसाय सांभाळून समाजकार्यात अग्रगण्य आहेत.
श्री. राजेंद्र वसंत बडगुजर (Director MIS Healthcare) सिंहगड रोड, पुणे. श्री. राजेंद्र शेठ हे उद्योजक असून त्यांचा फॉर्मासिटीकल प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन चे काम आहे.
तसेच श्री. राहुल प्रकाशशेठ बडगुजर (नर्मदा ऑफसेट अँड पेपर बॅग्स ) वारजे, पुणे युवा उद्योजक असून ते बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे चे माजी अध्यक्ष स्व. प्रकाशशेठ रघुनाथ बडगुजर यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी अगदी लहानपणापासूनच समाजकार्य आपल्या वडिलांना करतांना पाहिले आहे. व त्यातूनच प्रेरणा घेत त्यांचे विचार आज आपल्या कार्यातून पुढे घेऊन जात आहेत.
डॉ. श्री. सचिन शंकरराव रघुवंशी (अंकुर क्लिनिक,MD बालरोग तज्ञ ) वारजे, पुणे हे डॉक्टर आहेत व वेळोवेळी समाजातील व आपल्या प्रभागातील गरजूंना नेहमीच मदत करीत असतात. कोरोना काळात अनेक समाजबांधवांना त्यानी मदत व सहकार्य केले होते. पुणे वारजे येथे त्यांचा दवाखाना आहे.
“रोटरी क्लब” वारजे तर्फे रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, पाणी आडवा पाणी जिरवा यासारखे विविध उपक्रम दरवर्षी राबवले जातात. या कार्यात आपले समाजबांधव हिररीने सहभागी होत असतात. यामुळे यांची निवड करण्यात आली आहे.
श्री. राजेंद्र शेठ बडगुजर, श्री. राहुल शेठ बडगुजर व डॉ. सचिन बडगुजर या तिघांची वारजे रोटरी क्लबच्या डायरेक्टर पदी निवड झाल्याबद्दल बडगुजर समाज बहुऊद्देशीय संस्था व बडगुजर. इन टिम व समस्त बडगुजर समाज बांधव पुणे यांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Congratulations to all of three dignitaries elected as Rotorian ,Warje ,Pune.
It is really honour,and great social achivement.
All the best.
Suresh kotwal
Congratulations to all three dignitaries elected as Rotorian Pune all the best
Rajendrkumar kotwal
Congratulation all of you
Congratulations all of you
Congratulations to all of you
Congratulations to three of you. All the best for future growth
Congratulations both of you
Hearty Congratulations
Feel proud for your contributions in social services. The name BADGUJAR is spread with your almost efforts in the city like Pune.