धुळे येथील ज्येष्ठ समाज बांधव सेवानिवृत्त प्रा. सी. डी साळुंके सर यांनी राज्यस्तरीय देहांगदान साहित्य परिषद महाराष्ट्र तर्फे आयोजित करण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रभरातून विविध घोषवाक्य हजारोंच्या संख्येने साहित्य परिषदेकडे आले. त्यापैकी सर्वोत्कृष्ट घोषवाक्य सन्मान प्रा. सी. डी. साळुंखे सर यांनी पाठवलेल्या घोषवाक्यास मिळाला.
प्रा. सी. डी. साळुंखे सर हे सेवानिवृत्त झाले असून ते आता समाजातील भावी युवापिढीला युवा विचारांप्रमाणेच मार्गदर्शन करीत असतात. आपला अनुभव ते परिवारासोबत तसेच समाजातील युवकांना नेहमीच सांगत असतात आणि यातून विधायक कार्य करण्यास मदत होत असते.
साहित्याची आवड असलेले प्रा. सी. डी. साळुंखे सर नेहमीच काव्यरचना, लेख, समाज प्रबोधन विचार, बातमी लेखन करून आपले विचार लोकांपर्यंत पोहचवित असतात. यातून इतरांनाही प्रेरणा मिळते व तेही लिखणाकडे वळतात म्हणजे एक अद्भुत कलाशैली असलेले हे व्यक्तिमत्व यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल चोपडा/धुळे साळुंखे परिवार व बडगुजर. इन टिमकडून हार्दिक शुभेच्छा.
हार्दिक अभिनंदन चंदू आण्णा
Congratulations sir 💐💐🙏🙏
अभिनंदन सर आपले! प्रतिभावंत आहात आपण.
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन सर 💐💐💐