शिरपूर येथिल एच.आर.पटेल,औषध निर्माणशास्र महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या *राष्ट्रीय जी पॕट २०२२च्या परिक्षेत एकूण ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत पैकी १८ टॉपर ठरलेत व या १८ मधे भुसावळची सुवर्णा बडगुजर ही ६ वी टॉपर (१४५गूण) तर चाळीसगावचा सौरभ बडगुजर हा ११ व्या क्रमांकाचा (१३२ गुण)टॉपर ठरला.
सुवर्णा बडगुजर,भुसावळचे श्री.अरविंद विश्वनाथशेठ बडगुजर यांची सुकन्या असून सौरभ बडगुजर,चाळीसगावचे श्री.शशीकांत वामनशेठ बडगुजर यांचा सुपुत्र आहे.
दोघांच्या यशामुळे भुसावळ व चाळीसगाव बडगुजर समाजात आनंदाचे वातावरण असून,दोन्ही परिवारावर अभिनंदन तथा कु.सुवर्णा व सौरभवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,बडगुजरर्स प्रॉऊड टीम तसेच बडगुजर.इन टीम व समस्त बडगुजर समाजातर्फे दोन्ही राष्ट्रीय जी पॕट टॉपर्स व त्याच्या मातापित्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा 🌹🌹
Leave a Reply