ठाणे येथील एअर इंडिया मध्ये कार्यरत असलेले श्री. सतीश सुकलाल बडगुजर व डॉ. सौ वैशाली सतीश बडगुजर यांचा चिरंजीव रोहन याची चेन्नई येथील ग्रेट लेक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे पी जी पी एम म्हणजे व्यवस्थापन शास्त्रातील पदवीत्तर पदवी (MBA)साठी सन 2022-23 कोर्ससाठी यशस्वी निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
वडील श्री सतीश बडगुजर हे एअर इंडिया मध्ये उच्चपदस्थ तर आई सौ वैशाली बडगुजर ह्या डॉक्टरकी पेशामध्ये आणि बहीण कु. ऐश्वर्या ही विदेश व्यापार संस्थांमध्ये कार्यरत आहे. अशा सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या कुटुंबात जन्मलेल्या रोहन याने आपले बीटेक चे शिक्षण ‘सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ अंधेरी, मुंबई येथून पूर्ण केले. पदवी करत असताना त्याने सन 2018 मध्ये एअर इंडिया, तर सन 2019 मध्ये ब्लू स्टार आणि 2020 मध्ये एल टी आय या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप पूर्ण केली.
इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर लार्सन अँड टुर्बो इन्फोटेक या कंपनीमध्ये काॅलेज कॅम्पस सिलेक्शन द्वारा, ‘ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी’ पदी जुलै 2020 मध्ये त्याची निवड झाली. त्याच्यामध्ये असलेल्या विविध क्षमतांमुळे आणि कार्य तत्परतेमुळे केवळ एकाच वर्षात म्हणजे ऑगस्ट 2021 मध्ये याच कंपनीत, ‘सिनीयर डाटा इंजिनियर’ म्हणून त्याची पदोन्नती करण्यात आली.
सीखने की क्षमता एक उपहार है !
सीखने की योग्यता एक कौशल है !
लेकिन सीखने की इच्छा एक विकल्प है !!……
हाच विकल्प त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. बहिण कु. ऐश्वर्या ही दिल्ली च्या IIFT-आंतरराष्ट्रीय व्यवसाय संस्थेमार्फत एमबीए करत होती. त्याने पण एमबीएच्या परीक्षांची तयारी सुरू केली. आयटी क्षेत्रातल्या पूर्णवेळ नोकरीतून वेळ काढून मिळेल त्या वेळेत अभ्यास करुन अधिकाधिक अधिकृतता प्रमाणपत्रे प्राप्त करण्याच्या हेतूने तो एमबीए प्रवेश परीक्षा देत होता… जॉन मिल्टन याने म्हटले आहे….. God also serves them who can stand and wait…….
त्याच्या या अथक परिश्रमांना यश येऊन सन 2022-23 या एका वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएट व्यवस्थापकीय पदव्युत्तर पदवी एमबीए कोर्ससाठी ग्रेट लेक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चेन्नई येथे त्याला प्रवेश प्राप्त झाला. विशेष म्हणजे रोहन ह्या कोर्स साठी निवड झालेला सर्वात लहान वयाचा विद्यार्थी आहे. तो नेहमी म्हणतो…….
बेताब तमन्नाओ की कसक रहने दो..!
मंजिल को पानी की कसक रहने दो…!
चाहे मिला हो कुछ ना कुछ फिर भी.!
कुछ नया पाने की उमिद रहने दो…..!
त्याच्या या काही ना काही नवीन करण्याच्या उमेदीला बडगुजर समाजाच्या वतीने मानवंदना.आणि त्याला एमबीए पोस्ट ग्रॅज्युएशन साठी मिळालेल्या यशासाठी त्याची अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती, बडगुजर डॉट इन, बडगुजर ग्रुप च्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा…
भविष्यातही आपण अशाच नवीन वाटा चोखंदळत राहो या शुभेच्छांसह शुभम भवतु !! शुभम भवतु…..!!
शब्दांकन प्रा. मिलिंद बडगुजर जळगाव ( 9421184495 .)
Congratulations,
You will be inspiration for next generation.
Post MBA, keep rising your professional bar keeping Family & Social values intact.
congratulations and best whishes for further study..!!