अहमदाबाद येथील प्रा. डॉ. केतन बडगुजर सर यांना शिक्षण मंत्री, गुजरात राज्य यांच्या तर्फे मिळाला पुरस्कार – प्रा. मिलिंद बडगुजर, जळगांव

अहमदाबाद येथिल डॉ.केतन प्रवीण बडगुजर यांनी लालभाई दलपतभाई कॉलेज येथून बी.ई इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी ची पदवी प्राप्त केली. तर अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च पदवी मास्टर डिग्री(ME) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेगलोर येथून पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, मुंबई येथून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. सद्यपरिस्थितीत ते वर्ग एक अधिकारी तसेच गॅझेटेड अधिकारी म्हणून गुजरात शासनामध्ये गेल्या तेवीस वर्षांपासून कार्यरत आहेत. गुजरात एज्युकेशन डिपारमेंट (शिक्षण विभागा)मध्ये ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि लालभाई दलपतभाई कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अहमदाबाद येथे विभाग प्रमुख (इलेक्ट्रिकल एंजींनीयरिंग) म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. जिथे आपण शिकलो तिथेच शिकविण्याचा मान त्यांना यानिमित्ताने प्राप्त झाला. लालभाई दलपतभाई कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ही संस्था पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यासारखी एक प्रमुख शासकीय संस्था आहे.

जे जे आपणासी ठावे !! ते ते दुसऱ्याशी सांगावे!!
शहाणे करूनी सोळावे!!
सकल जन!!

या समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे 70 पेक्षा अधिक तज्ञ व्याख्यान संपूर्ण भारतभरमध्ये प्रस्तुत करण्याचं कार्य डॉ. केतन बडगुजर यांनी केले. एवढे महान काम करून सुद्धा समाजापासून आणि सन्मानापासून अलिप्त राहणारा हा अवलिया “मी मात्र नामानिराळा आहे ” असेच नेहमी म्हणत असतो.

“प्रगति के लिए प्रयास करें, पूर्णता के लिए नहीं”।” “शिक्षा का उद्देश्य प्रगतिशील मनुष्यों का निर्माण करना है, न कि केवल वे जो पूर्णता के पीछे अस्पष्ट रूप से भागते हैं। “

त्यांनी भारतातील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भोपाल (BHEL ), उच्च क्षमतेचे ट्रांसफार्मर आणि स्विच गिअर तयार करणाऱ्या अलाहाबाद येथील अरेवा कंपनीमध्ये (AREVA), तसेच ट्रान्सफॉर्मर्स अंड रेक्टिफायर अहमदाबाद(T&R Ahmedabad), आयआयटी मुंबई, आणि भारत भरातील अनेक तांत्रिक औद्योगिक क्षेत्रांमध्ये व्याखान दिलेल आहेत.

” सबसे तेज वही चलता है, जो अकेला चलता है,,,
लेकिन‬ दूर तक वही जाता है जो सबको साथ लेकर चलता हैं…!!!”

विविध संस्थांमध्ये कार्यरत असताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रिसर्च पेपर प्रकाशित केले आणि अनेक सभांना उपस्थिती दिली. आज ते पीएचडी आणि एम ई च्याविद्यार्थ्यांना मार्गदर्शक गाईड म्हणून काम करत आहेत. 2018 मध्ये त्यांनी राज्य प्लेसमेंट फेर मध्ये सह व्यवस्थापक म्हणून काम केले ज्यातून जवळपास 27 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.

“सफल और असफल लोग अपनी क्षमताओं में बहुत भिन्न नहीं होते हैं। वे अपनी क्षमता तक पहुँचने के लिए अपनी इच्छाओं में भिन्न होते हैं”- जॉन मैक्सवेल

यामुळेच आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक प्रकारची बक्षिसे आणि सन्मानपत्र मिळवलेली आहेत. त्यामध्ये विशेष सांगतांना TAG या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स संस्थेत 2009 मध्ये IISC सुवर्णपदक प्राप्त केले आहे. गुजरात शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या गुजरात टेक्नॉलॉजिकल विद्यापीठामध्ये (GTU) अध्ययन आणि अध्यापन क्षेत्रातील सर्जनशील ते साठी दिला जाणारा सन्मान त्यांना 2013 तसेच 2017 मध्ये प्राप्त झाला. भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयामार्फत दिला जाणारा पॉस्को संशोधन सन्मान 2014मध्ये त्यांना मिळाला. उत्कृष्ट संशोधनासाठी त्यांना भारतीय इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी मार्फत दिला जाणारा उत्कृष्ट संशोधन पेपर सन्मान 2013( IEEE INDICON )मध्ये प्राप्त झाला गुजरात शासनामार्फत दिला जाणारा सर्वोत्कृष्ट सहभाग मान्यता सन्मान ( Out standing contribution to Accreditation ) तसेच गुजरात शासनामार्फत नियोजन कृतीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानपत्र (Placement activity ) तसेच 6 मार्च 2021 मध्ये राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्था मंडळामार्फत दिला जाणारा सन्मान त्यांना देण्यात आला. ( Appreciation Certificate For NBA )

गेल्या एका दशकापासून ते गुजरात राज्याच्या एनबीए समितीचे सचिव सदस्य म्हणून काम पाहत आहेत मागच्या वर्षी एनबीए समितीचे काम पाहत असताना त्यांनी राज्यभरातील एकोणवीस संस्थांना भेटी दिल्या आणि 08 अभियांत्रिकी संस्थाना अभियांत्रिकी शिक्षण कमिशनर चे प्रतींनिधी म्हणून भेटी दिल्या आहेत. 40 पेक्षा अधिक इंजिनियरिंग प्रोग्राम ला अक्रेडिटेशन मिळवण्या साठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुजरात अभियांत्रिकीय विद्यापीठाने त्यांच्या या कामाची पावती म्हणून आपल्या विद्यापीठाच्या 15 व्या स्थापना दिनी गुजरात राज्याचे केबिनेट शिक्षण मंत्री आदरणीय श्री जितूभाई वाघाणी यांनी सन्मानित केले. याप्रसंगी शिक्षण मंत्री (राज्य कक्षा) डॉ.कुबेर सिंग दिंडोर, उपकुलसचिव डॉ. नवीन सेठ, कमिशनर ऑफ टेक्निकल एज्युकेशन श्री. जी. टी. पंड्या, शासकीय सदस्य श्री अमित ठाकर आणि इतर सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

It is on twitter account of minister of education shri. Jitubhai vaghani sir,

here is the link.

गुजरात इंजिनियरिंग क्षेत्रामध्ये फिनिक्स भरारी घेणाऱ्या या महान अवलियास बडगुजर समाजातर्फे मानाचा मुजरा. Hats off to you……and Best of luck…. आपल्या दीर्घायुष्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी अखिल भारतीय बडगुजर महासमिती, बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर डॉट इन या सर्वांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐
शब्दांकन प्रा. मिलिंद बडगुजर जळगाव ( 9421184495 ).

7 Comments

  1. Congratulations & Go Ahead💐💐👌👍

  2. डॉ. केतन बडगुजर ( अहमदाबाद). यांचे गुजरात शासनातर्फे झालेल्या गौरव बध़दल हार्दिक अभिनंदन!
    * डॉ केतन बडगुजर यांनी शैक्षणिक क्षेत्रात अति उच्च म अशी कामगिरी गुजरात राज्यात करून बडगुजर समाजाचे शिरपेचात
    मानाचा तुरा रोवला आहे!

    * डाव केतन हे सामाजिक कार्यात सुध्दा हिरीरीने सहभागी होत असतात! मार्गदर्शन करीत असतात!

    * डॉ केतन बडगुजर यांचे पुनश्च हार्दिक अभिनंदन !

    * रमेश वामनराव बडगुजर ( ठाणे)

  3. Congratulations.
    I hope that you continue to embrace your creativity and utilize it in your work for as long as possible.

Leave a Reply

Your email address will not be published.


*