||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
रक्तदान हेच श्रेष्ठदान मानणारा व जनसेवेसाठी लढणारा लढवय्या ना कुणाचा धीर, ना कुणाचा आधार, एकटाच तो धडपडला, घाव झेलुनी सावरला, शेवटी एकटाच लढला आणि जिंकला !!
रक्तदान हेच श्रेष्ठदान मानणारा धुळे जिल्ह्यातील कापडणे गावी १२ ऑक्टोंबर १९८७ ला जन्माला आलेला एक लढवय्या तो म्हणजे मा. श्री किशोर भिका बडगुजर हे होय, यांची घरची परिस्थिती जेमतेम बेताची दहावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी त्यांच्या गावी पूर्ण केले व त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी फैजपूर येथे आत्याच्या गावी केले. बारावीनंतर चे शिक्षण हे धुळे या ठिकाणी पूर्ण केले. तेच शिक्षण घेत असताना त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने अवघ्या महिना दोनशे रुपये पगारावर त्यांनी एक लॅब मध्ये काम केले त्यानंतर ते २००६ मध्ये नोकरीसाठी पुण्याला एका नामांकित पी. एस. आय. रक्तपेढीत आले तिथे त्यांनी ५ फेब्रुवारी २००६ ते ५ फेब्रुवारी २००९ पर्यंत काम केले व जगात कोणतेही काम छोटं नसून त्यांनी चक्क साफ सफाई कामगार म्हणून त्या ब्लड बँकेवर काम केले व तिथे काम करत असताना तिथल्या संचालक मंडळात मंडळींच्या व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कामाची प्रगती होत गेली व साफ सफाई कामगारांना नंतर त्यांची टेक्निशियन म्हणून त्याच ब्लड बँकेत पदोन्नती झाली व तिथूनच खरंतर त्यांच्या खऱ्या कार्यास सुरुवात झाली २००५ ते २००९ ही चार वर्ष ब्लड बँकेत टेक्निशियन म्हणून काम केल्यानंतर त्यांनी २००९ ला वागळे इस्टेट ठाणे येथे पहिली ब्लड बँक ही पार्टनरशिप मध्ये चालू केली व चार-पाच वर्षे त्यांनी डायरेक्टर म्हणून काम पाहिलं पण काही कारणास्तव ती ब्लड बँक मधून ते बाहेर पडले नंतर परत त्यांनी २०१४ मध्ये त्यांनी प्रयत्न करून खारघर नवी मुंबई मध्ये त्यांनी पुन्हा दुसऱ्या पार्टनर सोबत ब्लड बँक सुरू केली परंतु म्हणतात ना नशिबाचे भोग हे भोगायचेच आहेत व यातून कोणीच सुटणार नाही असंच त्यांच्या वाट्याला पुन्हा आलं व तेथून त्या समस्येला तोंड देऊन त्या ब्लड बँकेमधून ते बाहेर निघाले आता श्री. किशोर भिका बडगुजर हे भरपूर अडचणीत व नियतीने आपली अशी का परीक्षा घेत आहे या संभ्रमावस्थेत होते व त्यातूनच त्यांनी स्वतःला सावरले व नवीन उमेदीने, नवीन टीम सोबत काम करणं काय असते, एकठ्याने जरी काम केले तरी काय होऊ शकते हे दोन्ही अनुभव त्यांना आले त्यानंतर त्यांनी एकटच लढायचं ठरवलं व तिथूनच त्यांच्या आयुष्याला खरंतर कलाटणी आली व आपण रक्तपेढी सुरू करायची या निर्णयाने ते स्वतः खंबीर झाले व रक्तदान हेच श्रेष्ठदान म्हणत १९ फेब्रुवारी २०२१ ला त्यांनी डोंबिवली पहिली ब्लड बँक सुरू केली व त्यानंतर आज त्यांच्या दोन ब्लड बँक ह्या नियमित सुरळीतपणे सुरू आहेत आज त्यांच्या सुरू असलेल्या ब्लड बँक
१) मदरहूड हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटर, खारघर
२) श्री साई रक्तपेढी, पनवेल
३) डोंबिवली रक्तपेढी, डोंबिवली
४) सानवी इंटरप्राईजेस खारघर या युनिट हे त्यांच्या सौभाग्यवती जयश्री किशोर बडगुजर या संचालक म्हणून काम पाहत आहेत त्या चारही युनिटचे ते आज संस्थापक असून आज १७ वर्षे त्यांचे रक्त संकलन सुरू आहे या बँकेमार्फत आज मोठे-मोठे मिशन ब्लड डोनेशन कॅम्प या संस्थेमार्फत भरवले जातात व त्यांच्या या चारही संस्थांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे त्यांच्या या कार्याला साथ देणारे व त्यांच्यासोबत कायमस्वरूपी असणारे त्यांचे पाटनर निलेश पाटील यांची त्यांना खूप मोलाची साथ लाभली आहे व आजही ते त्यांच्या सोबत आहेत त्यांचे वडील भिका नारायण बडगुजर व मातोश्री सौ भारती भिका बडगुजर यांनी खडतर आयुष्यात संघर्ष काय असतो त्याची जाणीव त्यांना करून दिली त्यांच्या सोबत त्यांना त्यांच्या भावंडाचे म्हणजे श्री. अभय भिका बडगुजर, श्री. युवराज भिका बडगुजर, सौ. धनेश्वरी जगदीश बडगुजर यांचे तसेच संपूर्ण कुटुंबाची साथ लाभली असेही ते आवर्जून सांगतात यासोबतच आज जगात बर्याच प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत असतो हाच रक्ताचा तुटवडा ओळखुन आज किशोर बडगुजर यांनी एक पाऊल पुढे उचलून अनेक संकटांवर मात करून आज स्वतः दोन ब्लड बँकांचे ते संस्थापक असून बऱ्याच ब्लड बँक उभारण्यासाठीही त्यांच्या माध्यमातून आज मदत होत आहे व ते मदत करत आहेत अशा या रक्तदान शिबिराचे समन्वयकास आमचा सलाम …!! हे कार्याबद्दल, कर्तृत्ववान व रक्तदान शिबिर किंवा इतर रक्त क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना सेव्हन स्टार न्युज चॅनल कडून राज्यस्तरीय स्टार स्क्रॅपर अवॉर्ड देऊन त्यांना गौरवण्यात आले त्याबद्दल त्यांचे सर्व समाजात अभिनंदनचा वर्षाव होत आहे, तसेच अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. किशोर भिका बडगुजर – 92233 00850
Congratulations kishor and all the best for your future
Great…👍
💐💐 मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 💐💐
व पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा !