बोदवड येथील डॉ. अंकिता बडगुजर एमडी आयुर्वेदिक मध्ये उत्तीर्ण

बोदवड येथील डॉ.अंकिता बडगुजर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी. (आयुर्वेदिक) परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण होत धवल यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे बोदवड परिसरातील बडगुजर समाजातून वैद्यकीय क्षेत्रात एवढे उच्च यश मिळविणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये अंकिता यांनी आपले नाव कोरले आहे.

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक श्री विजय शंकरराव बडगुजर (साखळीकर)यांची कन्या व श्री पंकज रवींद्र बडगुजर यांची पत्नी डॉक्टर अंकिता बडगुजर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आरे पोद्दार मुंबई येथून एमडी आयुर्वेद पदवी उत्तीर्ण केली आहे. या यशाबद्दल तिचे बोदवड महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संस्थेचे चेअरमन मिठुलाल अग्रवाल, सचिव विकास कोटेचा तथा सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.तसेच सर्व समाजात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
बारावी नंतर अंकिता यांनी पुणे येथील टिळक आयुर्वेदिक कॉलेज येथून उच्च श्रेणीत बीएएमएस चा टप्पा पार केला. मध्यमवर्गीय बडगुजर कुटुंबात जन्मलेल्या अंकिता यांनी वैद्यकीय क्षेत्रात उच्च यश प्राप्त करणे ही घटना तशी विरळच म्हणावी लागेल. आपले ध्येय साध्या करण्यासाठी त्यांनी जिद्दीने अपार मेहनत घेत वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी मोठे यश संपादन केले आहे.आयुर्वेदिक जर्नलमध्ये त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाले आहेत. आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय, प्राध्यापकवर्ग, तसेच महाविद्यालयाला देत प्रियांका यांनी यापुढे रुग्णसेवा करून संशोधन कार्य सुरु ठेवण्याची इच्छा बाळगली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*