बोदवड येथील बडगुजर समाजावतीने रामनवमी चा कार्यक्रम उत्साहात संपन्न- श्री.संदीप बडगुजर बोदवड

दिनांक १०/४/२०२२ वार रविवारी, रामनवमी हा दिवस असल्याने प्रत्येक गांव , शहर येथे आपल्याला पद्धतीने आनंदात व उत्सवात साजरा करण्यात आला. तसेच बोदवड येथील बडगुजर समाज बांधवांनी चैत्र शुद्ध रामनवमी च्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोरोनाच्या प्रदीर्घ कालांतराने हा कार्यक्रम आयोजित केला. प्रथम आपल्या कुलदैवत श्री. चामुंडा मातेची व श्रीराम देवतेची प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

बोदवड येथील सर्व समाज बंधू आणि, भगिनी प्रचंड संख्येने उपस्थित होते. श्री.शांताराम बाबुराव बडगुजर यांना समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान देण्यात आले, व प्रस्थावना ही जगदीश बडगुजर यांनी केली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आपले प्रथमच दोन नगरसेवक निवडणून श्री. विजय शिवराम बडगुजर नगरसेवक यांचा सत्कार श्री.शांताराम बाबुराव बडगुजर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला व २) सौ.मनीषा कैलास बडगुजर यांचा सत्कार डॉ.सौ.वंदना बडगुजर यांचे हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. व डॉ. अंकिता विजय बडगुजर हे आता नुकतीच आयुर्वेदिक मध्ये एम डी पदवी मिळाली तर त्यांच्या आई सौ. संगीता विजय बडगुजर वडील श्री. विजय शंकर बडगुजर व सासूबाई व सासरे श्री. रविंद्र जगन्नाथ बडगुजर यांचाही गुलाब पुष्प, श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला

या कार्यक्रममाचे नियोजन हे समिती अध्यक्ष श्री.अनिरुद्ध बडगुजर, उपाध्यक्ष श्री.अमोल बडगुजर, कोषाध्यक्ष श्री.नितीन बडगुजर, श्री. अजय बडगुजर, श्री.संदीप बडगुजर, श्री. धनराज बडगुजर, श्री. संजय बडगुजर, श्री. मुकेश बडगुजर, श्री.जगदीश बडगुजर सर,डॉ. यशपाल बडगुजर, श्री.मयुर बडगुजर, श्री. विनोद बडगुजर, श्री. बंडु बडगुजर यांच्या सहकार्याने पार पडला व सर्व उपस्थित समाज बांधव यांनी भोजनाचा आस्वाद घेऊन, सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रची सांगता करण्यात आली धन्यवाद🙏🙏


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*