बडगुजरांची विजयी पताका, एक पाऊल पडते पुढे ………
साखळी येथील विविध कार्यकारी सोसायटी ची निवडणूक दिनांक 26 मार्च 2022 रोजी झाली. या निवडणुकीत एकूण सहा बडगुजर यांनी आपले नशीब आजमावले. यापैकी तीन बडगुजर दोन पुरुष एक महिला यांनी विजय प्राप्त केला.
तसेच या निवडणुकीत श्री वसंत लटकन बडगुजर व पांडुरंग रामकृष्ण बडगुजर यांना केवळ दोन मतांनी पराभव स्वीकारावा लागला. साखळी येथील श्री. चामुंडा बहुउद्देशीय बडगुजर समाजाच्या वतीने विजयी उमेदवार व पराभव पराभूत उमेदवार यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण भिका बडगुजर होते .यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
तसेच ज्येष्ठ समाज बांधव श्री. काशिनाथ (अप्पा) बडगुजर व डॉ. श्री सुनील पाटील (दोडे गुजर) यांच्या हस्ते विजय व पराभूत उमेदवारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूर्यभान पंडित बडगुजर यांनी केले या कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
विजयी उमेदवारांची नावे
१. श्री राजू पंडितशेठ बडगुजर
२. श्री मोहन काशिनाथशेठ बडगुजर
३. श्रीमती आशा रवींद्र बडगुजर
या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय समाजबांधव
श्री.अशोक पंडित शेठ बडगुजर
ग्रामपंचायत सदस्य श्री. नूतन दगडूशेठ बडगुजर
श्री. सुनीलशेठ बडगुजर
श्री.शिवचरण रामदास बडगुजर
श्री.जीवन प्रभाकर बडगुजर
श्री. लालचंद भिका बडगुजर
श्री. प्रकाश एकनाथशेठ बडगुजर
श्री.दगडू नथूशेठ बडगुजर
श्रीमती. आशाताई रवींद्र बडगुजर
सौ.सुनंदा दिलीप बडगुजर
Leave a Reply