भुसावळ तालुक्यामधे कारोंना संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.सर्व जनतेचे लसीकरण होणे साठी मातृभूमि सर्वांगीण विकास संस्था, जळगांव या संस्थेने जनतेमधे लसीकरण विषयक जन जागृती करुन त्यांना लसीकरण केंद्रा पर्यंत घेऊन जाऊन लसीकरन करुन घेत आहेत. “मानव सेवा हिच ईश्वर सेवा” सेवाभावी कार्य करीत आहेत, लसीकरण झाल्यानंतर चहा व बिस्किट देण्यात येत आहे.
मातृभूमि सर्वांगीण विकास संस्था अध्यक्ष श्री. संजय जगन्नाथ बडगुजर (कढोली कर) यांच्या संकल्पनेतून कोविड १९ विषयी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.या पूर्वी ही २०२० मध्यील कोरोना काळात स्थलांतरित बांधकाम मजुरांना अन्य धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे महाशय जिल्हा धिकारी साहेब यांचे मार्गदर्शन खाली मातृभूमि सर्वांगीण विकास संस्थे कडून मोफत अन्य धान्य वाटप करण्यात आले होते
श्री संजय जगन्नाथ बडगुजर साहेब(मातृभूमी सर्वांगीण विकास संस्था, जळगाव)यांचे उपक्रम नित्य समाजसेवी व उत्तम असतात.
शुभेच्छांसह!
/डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती